'डार्लिंग्स' या चित्रपटामुळे अभिनेता विजय वर्मा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटात अभिनेत्याने आलिया भट्टच्या पतीची भूमिका साकारली होती.
चित्रपटात विजयने 'हमजा' ही नकारात्मक भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे त्याची नकारात्मक भूमिकासुद्धा प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली आहे.
विजयवर अनेक तरुणी फिदा झाल्या आहेत. इतकंच नव्हे तर विदेशातून लग्नासाठी मागण्या येत आहेत. पाहूया नेमकं काय घडलंय.
सध्या विजय 'मिर्झापूर ३' च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्यासाठी तो नुकतंच लखनऊला गेला होता. दरम्यान त्याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
या व्हिडीओवर त्याला प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या होत्या. यामध्ये काही तरुणींनी अभिनेत्याला लग्नासाठी मागणीही घातली होती.
एका तरुणीने कमेंट करत लिहलं होतं, 'प्लिज पाकिस्तानमध्ये येऊन, माझ्या आईबाबांकडे आपल्या लग्नाची बोलणी करा'. यावर मजेशीर उत्तर देत विजयने लिहलंय , लखनऊचं शेड्युल पूर्ण करुन पाकिस्तानला येण्याची योजना आखतो'.
तर आणखी एका तरुणीने कमेंटमध्ये लिहलंय, 'प्लिज फ्रान्सला या, माझी आई तुमची वाट पाहात आहे'. यावर उत्तर देत विजयने म्हटलं, 'माझ्याच पालकांना मला फार कमी भेटायला मिळत'.