‘घरात बसा सांगणारे देश सोडून पळाले’; आलिया-रणबीरवर नेटकरी संतापले
‘इतरांना सांगतात घरात बसा अन् स्वत: देशाबाहेर पळतात’; मालदिवला गेलेल्या आलिया-रणबीरवर नेटकरी संतापले
|
1/ 5
बॉलिवूडमधील अनेक कलाकार सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी सध्या मालदीव गाठताना दिसत आहे. मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यांवर शांतपणे बसून ही सेलिब्रिटी मंडळी आयुष्याचा आनंद घेत आहेत.
2/ 5
इतर बॉलिवूड कलाकारांपाठोपाठ आता आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी देखील मालदीव गाठलं. विमानतळावरील त्यांचे फोटो सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. मात्र हे फोटो पाहून काही नेटकरी मात्र संतापले आहेत. काय आहे त्यांच्या संतापाचं खरं कारण.
3/ 5
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. अर्थात योग्य उपचार घेऊन दोघंही बरी झाली. परंतु त्यावेळी त्यांनी देशभरातील लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला होता.
4/ 5
पिकनिकला जाण्यासाठी आयुष्य पडलं आहे. आता किमान इतरांच्या सुरक्षिततेसाठी तरी घरात बसा असा सल्ला त्यांनी दिला होता. मात्र आता हिच मंडळी चक्क देशाबाहेर पिकनिकला जात आहे. त्यामुळं नेटकरी संतापले आहेत.
5/ 5
“हे बॉलिवूडवाले खूप निर्लज्ज आहेत. इतरांना सांगतात घरात बसा अन् स्वत: मात्र देशाबाहेर जाऊन मजा मारतात.” “या पळपुट्या कलाकारांच्या चित्रपटांवर बंदी घाला” अशा आशयाच्या कॉमेंट करुन काही नेटकऱ्यांनी आपला राग व्यक्त केला आहे.