advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Akshaya-Hardeek Love Story : आधी 'या' अभिनेत्याच्या प्रेमात होती अक्षया; मग असा रंगला हार्दीकवर जीव

Akshaya-Hardeek Love Story : आधी 'या' अभिनेत्याच्या प्रेमात होती अक्षया; मग असा रंगला हार्दीकवर जीव

अभिनेत्री अक्षया देवधर अभिनेता हार्दीक जोशीबरोबर लग्न करतेय. याआधी ती एका प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर डेट करत होती.

01
सगळ्यांचे लाडके राणा दा आणि अंजली बाई 2 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांची लव्ह स्टोरी एकदम हटके आहे. हार्दीकनं स्वत:याचा खुलासा केला होता.

02
हार्दीक आणि अक्षया तुझ्यात जीव रंगलाच्या निमित्त 5 वर्ष एकत्र काम करत होते. तेव्हा त्यांची मैत्री पाहून हार्दीकच्या आईच्या मनात दोघांच्या लग्नाचा विचार आला होता.

03
हार्दीकनं बस बाई बसमध्ये दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं होतं. तो म्हणाला होता, 'मालिकेदरम्यान आमची मैत्री झाली. लग्नाचा विचार माझ्या डोक्यात नव्हता'.

04
'माझी आई अक्षयला नेहमी विचारायची की मला तू आवडतेस  तुला काय वाटतं? मला यातलं काही माहिती नव्हतं'.

05
 'आमची मालिका संपली आणि आईनं लग्नासाठी तगादा धरला. दुसरी मालिका नाहीये. सध्या घरी आहेस तर लग्नाचा विचार कर. वय निघून जातंय, असं ती सारखी मला म्हणायची'.

06
आई मला म्हणाली, 'अक्षयाशी तू लग्नासाठी बोलून बघ.  तेव्हा मी आईला म्हटलं, मी असं केलं तर ती कुठे माझ्याशी थोडं बोलते तेही बंद करेल. मी माझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी आईसाठी करतो. म्हणून मी अक्षयाला लग्नासाठी विचारलं'.

07
'आपल्या दोघांच लग्न व्हावं अशी माझ्या आईची इच्छा आहे', असं मी अक्षयाला म्हणालो. त्यावर ती, 'ठिक आहे  तू एकदा माझ्या घरी येऊन बोल', असं म्हणाली.

08
'मी अक्षयाच्या घरी गेलो. तिच्या आई-वडिलांशी बोललो. त्यांनी विचार केला आणि थेट6 महिन्यांनंतरच्या लग्नाच्या तारखाच काढल्या'.

09
'20 एप्रिलला मला सगळं सांगितलं दहा दिवसांमध्ये आमचा साखरपुडा झाला. आईच्या इच्छेनुसार, ३ मेला आईच्या वाढदिवशी आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आम्ही साखरपुडा केला'.

10
हार्दीक असंही म्हणाला की,  'आई बोलली नसती तर मी कधीच अक्षयाला लग्नासाठी विचारलं नसतं'.

11
हार्दीक आधी अभिनेता सुयश टिळकबरोबर अक्षया रिलेशनमध्ये होती. मात्र दोघांनी नात्याला पूर्णविराम देत आता नवीन आयुष्याची सुरूवात केली आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • सगळ्यांचे लाडके राणा दा आणि अंजली बाई 2 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांची लव्ह स्टोरी एकदम हटके आहे. हार्दीकनं स्वत:याचा खुलासा केला होता.

    MORE
    GALLERIES