काही दिवसांआधी 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्करांची घोषणा करण्यात आली होती. आज या पुरस्कारांचं दिल्लीत वितरण करण्यात आलं. देशाच्या राष्ट्रपती द्रौपती मुनमु यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यावेळी बोलताना आशा पारेख यांनी पुरस्कारासाठी सर्वाचे आभार मानले.
गायक राहूल देशपांडे याला मी वसंतराव सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गोष्ट एका पैठणीचीचे दिग्दर्शक शांतनू रोडे यांनी उत्कृष्ट मराठी सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला.
विशेष उल्लेखनीय फिचर फिल्मसाठी जून या मराठी सिनेमासाठी अभिनेता सिदार्थ मेननला पुरस्कार देण्यात आला.
विशेष उल्लेखनीय फिचर फिल्म गोदाकाठ आणि अवांचित या मराठी चित्रपटासाठी अभिनेता किशोर कदम यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
तानाजी : द अनसंग वॉरियर या सिनेमासाठी अभिनेता अजय देवगणला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.
सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून आकांक्षा पिंगळे हिला चित्रपट सुमीसाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.
त्याचप्रमाणे तिसरा सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून दिव्येश इंदुलकर याला चित्रपट सुमीसाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.
सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट फनरल मराठी चित्रपटासाठी विवेक दुबे यांनी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.