बुरख्याशिवाय फिरायची अफगाणी पॉपस्टार; जंग जंग पछाडणाऱ्या तालिबानच्या हातावर तुरी देऊन झाली पसार
अफगाणीस्तानची प्रसिद्ध पॉपस्टार आर्यना सय्यदने तालिबान्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली आहे.
|
1/ 6
अफगाणिस्तानची (Afghanistan) लोकप्रिय पॉप स्टार आर्यना सय्यद (Aryana Sayeed) हीने गुपचूप तालिबानच्या तावडीतून पळ काढला आहे. अन्यथा तिच्यावर फार वाईट वेळ असती. तर याची माहिती तिने स्वतःच सोशल मीडियावरून दिली होती.
2/ 6
आर्यना सय्यद (Aryana Sayeed) सोशल मीडियावर फारच प्रसिद्ध आहे, तिने लिहीलं की, ‘काही भयानक रात्रींनंतर कतारला पोहोचले आहे आणि आता इस्तंबुलसाठी शेवटच्या फ्लाइटची वाट पाहत आहे.' त्यानंतर काही वेळाने तिने हे ही सांगितलं की ती इस्टंबूलसाठी निघाली आहे.
3/ 6
अफगाणी पॉपस्टारने हे देखील सांगितलं की, तिच्याकडे देशातील अनेक कहान्या सांगण्यासाठी आहेत. दरम्यान तिची आता तालीबानच्या तावडीतून सुटका झाली आहे. आर्यनाच्या आईवडीलांनी ती ८ वर्षांची असतानाच देश सोडला होता. ते लंडनला शिफ्ट झाले होते. मात्र आर्यना आपल्या मायदेशी अनेकदा यायची.
4/ 6
तालिबानने काबूलवर ताबा मिळवला तेव्हा ती तिथेच होती. खूपच मुश्किलीने तिने तेथून स्वतःचा बचाव केला.
5/ 6
आर्यना अफगाणीस्तानात फारच प्रसिद्ध आहे. तिने काही शो देखील जज केले आहे.
6/ 6
नेहमीच बुरख्याशिवाय आणि हिजाशिवाय दिसणारी आर्यना सय्यदने 2014 मध्ये एका अमेरिकी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, काही कट्टरपंथी नेत्यांनी तिला मारण्याचं फरमान काढलं आहे. तर तिला मारणाऱ्याला जन्नत मिळेल असंही त्यांनी सांगितलं होतं.