अभिनेत्री रसिका सुनील सध्या तिच्या फोटोशुटमुळे चांगलीच चर्चेत आहे. बॉयफ्रेंडसोबत तिने फोटो शेअर केले आहेत. पाहा फोटो. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून घराघरात पोहोचलेली शनया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील. रसिका गेली काही वर्षे बॉयफ्रेंड आदित्य बिलगी सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अनेकदा सोशल मीडियावर ते फोटो शेअर करतात. आदित्य हा अमेरिकेत असतो. तर रसिका देखील काही महिने तिकडेच होती. त्यांच्यातील बॉन्ड ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेनंतर रसिकाला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. काही महिन्यांपूर्वीच मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. रसिकाची मोठी फॅनफॉलोइंगही आहे. त्यांच्या फोटोंना अनेक कमेंट्स आणि लाइक्सही मिळत आहेत.