
सध्या जोनस परिवारामध्ये आनंदाचे वातावरण आहे कारण अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनस (Priyanka Chopra Jonas)ची मोठी जाऊबाई अर्थात प्रसिद्ध अभिनेत्री सोफी टर्नर (Sophie Turner) आई बनली आहे. (फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम @priyankachopra)

सोफी टर्नर आणि जो जोनस (Joe Jonas) यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झाले आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @sophiet)

सोफी तिच्या प्रेग्नन्सीमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत होती. सोफी आणि जो दोघांनीही याबाबत सोशल मीडियावर कोणती घोषणा केली नव्हती. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @sophiet)

मीडिया अहवालानुसार गेल्या आठवड्यात बुधवारी सोफीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @sophieturner)

टीएमजेडच्या एका अहवालानुसार 22 जुलै रोजी सोफीने लॉस एंजलिसच्या एका हॉस्पिटलमध्ये मुलीला जन्म दिला आहे. सोफी आणि जो या दोघांनी त्यांच्या मुलीचं नाव Willa असे ठेवले आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @sophiet)

सोफीचे बेबी बंप फ्लाँट करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. बऱ्याचदा ती नवरा आणि पॉप सिंगर जो जोनसबरोबर हातात हात घालून फिरताना देखील दिसली होती.

2016 मध्ये सोफी आणि जो ने एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली होती. गेल्या वर्षी मे मध्ये दोघांनी लास वेगासमध्ये लग्न केले. यावेळी त्यांचे फोटो खूप व्हायरल झाले होते. त्यानंतर त्यांनी फ्रान्समध्ये त्यांच्या परिवाराबरोबर देखील दुसरे लग्न केले होते. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @sophiet)

सोफी आणि प्रियंकामध्ये देखील खूप चांगले बाँडिंग दिसून येते. दोघीही त्यांच्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @priyankachopra)

नात्याने प्रियंका सोफीची धाकटी जाऊबाई आहे. मात्र वयाने सोफी प्रियंकापेक्षा खूप लहान आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @sophiet)




