महाराष्ट्राची हास्यजत्रामधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता ओंकार भोजनेचा सरला एक कोटी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
सरला एक कोटी सिनेमात ओंकारबरोबर अभिनेत्री ईशा केसकर प्रमुख भूमिकेत आहे. ईशा ही सरला साकारतेय तर ओंकार भिकाची भूमिका साकारतोय.
तसंच गुरू ठाकूर यांनी लिहिली सुंदर गाणी रिलीज झालीत. त्यातील एका गाण्यात ईशा आणि ओंकार यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळतोय.
ईशा आणि ओंकार यांनी रोमँटिक सीन्स कसे शुट केले याविषयी सांगताना ईशा म्हणाली, 'गाण्याचं शुटींग करताना एक दडपण होतं. कारण मी कधीच अशाप्रकारे रोमँटिक गाण्याचं शुट केलं नव्हतं'.
'शुट करताना आम्ही असा विचार नाही केला की, आता सगळ्या लोकांसमोर शुट करायचं आहे. ते नंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. असं केलं असतं तर आम्हाला दडपण आलं असतं'.
'रोमँटिक शुटच्या वेळी आम्ही एकमेकांचे हात धरले आणि म्हटलं मित्रा ही फक्त भूमिका आहे. असं आम्ही सगळं गाणं शुट केलं'.