स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अश्विनी महांगडे दरवर्षी आषाढी वारीला जाते.
यंदाही ती एका कार्यक्रमानिमित्त वारीत सहभागी झाली होती. तिच्यासाठी यंदाचा अनुभव हा शब्दात मांडता न येणारा होता.
वारीतील तिचे काही फोटो शेअर करत तिनं तिच्या भावना व्यक्त केल्यात. वारी म्हणजे नेमकं काय? याचा तिला उमगलेला अर्थ तिने तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केलाय.
अश्विनी म्हणाली, 'शब्दात मांडता न येणारा असा या वर्षीचा वारीचा अनुभव आहे. आत्मिक समाधान म्हणजे वारी. वारकऱ्यांच्या डोळ्यात दिसणारी भक्ती म्हणजे वारी'.
वारीचा अर्थ सांगताना पुढे अश्विनी म्हणाली, 'आमंत्रण नसूनही लाखोंच्या संख्येने सहभागी होणारे वारकरी आणि त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद याचा अर्थ समजायला कदाचित आयुष्य जाईल'.
अश्विनी पारंपरिक नऊवारी वेशात वारीत सहभागी झाली होती. तिच्या निखळ सौंदर्यावर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय.
अश्विनीनं वारीत वारकऱ्यांची भेट घेतली. त्याच्यांबरोबर जमिनीवर बसून तिनं स्नेहभोजनाचा आनंदही घेतला.