मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यांनी स्टार प्रवाहवरील 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत छोट्या पडद्यावर पुनरागमन केले.
स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे ही मालिका मागच्या काही महिन्यांपासून TRP शर्यतीत टॉप वनवर आहे. सध्या मालिकेत मालिकेत मल्हार कामत आणि स्वराजचा सांगीतिक प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
मल्हारने आपल्या गाण्याचं शिक्षण ज्यांच्याकडून घेतलं ते त्याचे गुरु पंडीत मुकुल नारायण ही व्यक्तिरेखा विक्रम गोखले साकारत आहेत. बऱ्याच वर्षांनंतर विक्रम गोखले छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहेत.
आता विक्रम गोखलेंसोबत काम करायला मिळणं ही एखाद्या अभिनेत्यासाठी भाग्याची गोष्ट असते. आता अभिजित खांडकेकरने सुद्धा अशाच भावना व्यक्त केल्या आहेत.
अभिजितने सोशल मीडियावर विक्रम गोपाळेंसोबतचे फोटो शेअर करत म्हटलं आहे कि, ''तुझेच मी गीत गात आहे च्या निमित्तानं विक्रम गोखलें बरोबर पुन्हा काम करण्याची संधी मिळाली…''
त्याने पुढे लिहिलं आहे कि, ''इतकी वर्ष रंगभूमी , मराठी ,हिंदी चित्रपटांमध्ये स्वतःचं अढळ स्थान निर्माण करणाऱ्या अशा दिग्गजाबरोबर चित्रीकरण करताना खूप आनंद मिळाला. धन्यवाद काका. लव यू''
तुझेच मी गीत गात आहे मालिकेत सध्या आपण पाहत आहोत की, मालिकेत मल्हार सध्या द्विधा मनस्थितीमध्ये आहे. एकीकडे वैदेहीच्या आठवणी तर दुसरीकडे लेकीचा शोध सुरू आहे. असं असताना पंडितजींच्या येण्याने मल्हारच्या आयुष्यात नवं वळण येणार आहे.
मालिकेत सध्या पंडितजी मल्हारवर रागावून वापस निघाले आहेत. त्यांना थांबवण्यासाठी स्वराज प्रयत्न करणार आहे. आता पंडितजींचा राग शांत होणार का, ते स्वराजला माफ करणार का हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.