'आई कुठे काय करते' या मालिकेतून अभिनेत्री रुपाली भोसले संजनाच्या भूमिकेतून प्रेक्षकांची वाहवाह मिळवत आहे. संजना हे खलनायिकेचं पात्र असूनसुद्धा प्रेक्षक रुपालीवर भरभरुन प्रेम करत आहेत.
रुपाली भोसले अनेक हिंदी-मराठी मालिका आणि बिग बॉस मराठीसारख्या शोमध्ये झळकली आहे. तिचा अफाट चाहतावर्ग आहे.
रुपालीच्या व्यावसायिक आयुष्याबाबत जवळजवळ सर्वांनाच माहिती आहे. मात्र तिच्या खाजगी आयुष्याबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे.
खऱ्या आयुष्यात रुपाली भोसलेचं लग्न झालं होतं. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना रुपालीने लग्नाचा निर्णय घेत संसार थाटला होता.
लग्नानंतर अभिनेत्री पती आणि सांसरच्यांसोबत लंडनमध्ये स्थायिक झाली होती. सुरुवातीला सर्वकाही ठीक वाटलं पण नंतर त्या लोकांनी अभिनेत्रीवर अनेक बंधने लादायला सुरुवात केली.
दरम्यान रुपालीच्या भावाचा गंभीर अपघात झाला होता. त्यावेळी त्यांनी रुपालीला धीर द्यायचं दूरच साधी प्रकृतीची विचारणाही केली नाही.
या सर्वांमध्ये रुपालीला नवऱ्याने आणि सासरच्या लोकांनी एकटं पाडलं होतं. म्हणून नाइलाजाईने मोठा निर्णय घेत रुपालीने घटस्फोट घेतला होता. या लग्नात आपला प्रचंड मानसिक छळ झाल्याचं रुपाली सांगते.
दरम्यान घटस्फोटाच्या काही वर्षानंतर रुपाली भोसले अंकित मगरेच्या प्रेमात पडली होती. या दोघांच्या नात्याची बरीच चर्चा झालेली. दोघेही लग्नगाठ बांधतील अपेक्षा होती.
परंतु काहीच दिवसांत रुपाली आणि अंकितचा ब्रेकअप झाला होता. एकमेकांबाबत आमच्या मनात काहीच तक्रारी नाहीत. आम्ही दोघांनी मिळून सामंजस्याने हा निर्णय घेतला असल्याचं रुपालीने एका मुलाखतीत सांगितलं होतं.