आई कुठे काय करते मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. मालिकेत मधुराणी प्रभुलकर अरुंधतीची भूमिका साकारताना दिसते. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मधुराणीनं नुकताच तिचा रेट्रो लुकमधला एक फोटो शेअर केला आहे. मधुराणीचा हा लुक पाहून चाहत्यांना मात्र जुन्या अभिनेत्रींची आठवण झाली आहे. तिचा हा लुक पाहून 'क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो..' हे गाणं आपोआप ओठावर येते. सध्या आई कुठे काय करते मालिका एका वेगळ्या वळणवर आहे. मालिकेचे कथानक अरुंधतीभोवताली फिरताना दसते. ( फोटो साभार- मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम)