गायक केवळ एक गाणं गाण्यासाठी किती रुपये फी आकारतात माहितीये का? चला आज भारतातील टॉप भारतीय गायकांच्या फीबद्दल जाणून घेऊ.
रिपोर्ट्सनुसार, भारतातील सर्वाधिक कमाई करणारी महिला गायिका श्रेया घोषाल आहे, जी गाणी गाण्यासाठी 25 लाख रुपये घेते.
तर सध्याचा सगळ्यात टॉपचा गायक अरिजित सिंग देखील प्रत्येक गाण्यासाठी 20-22 लाख रुपये इतकेच शुल्क घेतो.
दुसरीकडे, सर्वाधिक कमाई करणार्या भारतीय गायकांच्या यादीत पुढील स्थान सोनू निगम प्रत्येक गाण्यासाठी 18-20 लाख रुपये घेतात. तर शान एका गाण्यासाठी 10 लाखांपेक्षा जास्त फी घेतो.
देशातील सर्वाधिक गाण्याचे शुल्क आकारणाऱ्या गायकांमध्ये नेहा कक्कर, मिका आणि हनी सिंग यांचा समावेश आहे, जे एका गाण्यासाठी 10 लाखांपेक्षा जास्त फी घेतात.
सध्याच्या टॉपच्या गायकांमध्ये जुविन नौटियालचा देखील समावेश होतो. तो एका गाण्यासाठी 5 ते 7 लाख रुपये घेतो तर लाइव्ह कॉन्सर्टसाठी 50 ते 60 लाख रुपये घेतो.
बहुतेक गायक भारतीय चित्रपटांमध्ये प्रति गाण्यासाठी सुमारे 5-10 लाख रुपये आकारतात, तर मोजकेच जण एका गाण्यासाठी 20 लाखांहून अधिक कमाई करतात. मात्र, भारतात फक्त एकच व्यक्ती 25 लाखांपेक्षा जास्त फी घेतो आणि तो म्हणजे संगीतकार ए आर रहमान. अनेक रिपोर्ट्समध्ये असे म्हटले गेले आहे की गायक-संगीतकार प्रत्येक गाण्यासाठी 3 कोटी रुपये घेतात.