सैराट या सिनेमाला आज, 29 एप्रिलला सात वर्षे पूर्ण झाले आहेत. यानिमित्त सैराट फेम आर्ची म्हणजे रिंकू राजगुरूनं परशासोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
सैराट सिनेमाला संपूर्ण महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं. या सिनेमामुळं आर्ची आणि परशाची जोडी महाराष्ट्रात लोकप्रिय झाली.
नागराज मंजुळे दिग्दर्शित या सिनेमानं यशाचे सर्व रेकॉर्ड मोडले. या सिनेमातील गाणी असतील किंवा डायलॉग प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले.
दोघही मराठीसह बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाचा डंका वाजवताना दिसत आहेत. ( फोटो साभा- रिंकू राजगुरू इन्स्टाग्राम)