दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या खुशबू सुंदरने तिच्या वडिलांवर गंभीर आरोप केले होते. तिने तिच्या वडिलांवर लैंगिक छळाचे आरोप केले होते आणि आता आणखी एका साऊथ अभिनेत्रीनेही तिच्या वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, तिच्या वडिलांनी तिच्या आई आणि बहिणीचे जगणे कठीण केले आहे.
ही अभिनेत्री मल्याळम अभिनेत्री अर्थनू बिनू आहे. तिनं तिचे वडील आणि अभिनेता विजयकुमार आपल्या घरात प्रवेश करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. घटस्फोट होऊनही तिचे वडील तिच्या कुटुंबात अराजकता निर्माण करत असल्याचे अभिनेत्रीचे म्हणणे आहे. अभिनेत्रीने विजयकुमारवर धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
अर्थना बिनूने सोशल मीडियावर सांगितले की, तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि कोणतीही कारवाई झाली नाही. अभिनेत्री म्हणते की, ही काही पहिलीच वेळ नव्हती, पण पोलिसांकडे अनेक तक्रारी करूनही विजयकुमारवर कोणतीही कारवाई झालेली नाही.
अर्थनाने सांगितले की, तिचे आई-वडील वेगळे झाले आहेत आणि ती आई, बहीण आणि आजीसोबत राहत आहे. तिने तिच्या वडिलांवर रोज त्रास दिल्याचा आरोप केला आहे. अर्थनाने विजयकुमारबद्दल खुलासा केला आणि एक लांबलचक चिठ्ठी लिहिली, ज्यामध्ये ती म्हणते, 'आज ते (वडील) आमच्या घरात आले आणि दरवाजा बंद असल्याने, उघड्या खिडकीतून आम्हाला धमकावत होते. जेव्हा मी त्यांनी माझ्या बहिणीला आणि आजीला मारण्याची धमकी दिली तेव्हा मी त्यांच्याशी बोलले. त्यावेळी त्यांनी मला धमकीही दिली.
अभिनेत्री म्हणते की, 'ते मला चित्रपटात अभिनय करणं थांबवणं सांगायचे आणि मी त्यांचे ऐकले नाही तर ते काहीही करू शकतात. त्यांनी सांगेल त्याच चित्रपटात मी काम करावं अशी त्यांची इच्छा आहे. त्यांनी माझ्या आजीवर उदरनिर्वाहासाठी मला विकल्याचा आरोप केला. मी नुकतेच शूटिंग पूर्ण केलेल्या माझ्या मल्याळम चित्रपटाच्या टीमसोबत वाईट वर्तन केले. मी आणि माझ्या आईने याबाबत कोर्टात केस दाखल केली आहे.
विजयकुमारने तिचे चित्रपट आणि अभिनय थांबवण्यासाठी तिच्यावर केस दाखल केल्याचा दावाही अभिनेत्रीने केला आहे. अभिनेत्री पुढे म्हणाली, 'मी माझ्या इच्छेनेच चित्रपटांमध्ये काम करत आहे. अभिनय ही माझी नेहमीच आवड आहे आणि जोपर्यंत माझी प्रकृती मला साथ देईल तोपर्यंत मी अभिनय करत राहीन. जेव्हा मी मल्याळम चित्रपटात काम करते तेव्हा ते मला अभिनय करण्यापासून थांबवण्यासाठी खटला दाखल करतात. मी जेव्हा शायलॉकमध्ये काम केले तेव्हाही त्यांनी कायदेशीर खटला दाखल केला आणि हा चित्रपट रद्द होण्यापासून वाचवण्यासाठी मला अधिकृत कायदेशीर कागदपत्रावर स्वाक्षरी करावी लागली की, मी माझ्या स्वेच्छेने चित्रपटात काम केले आहे.