अशीच एक घटना आता हरियाणाच्या भिवानीमधून समोर आी आली आहे. यात एका महिलेनं आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.
यानंतर तपास सुरू करून पोलिसांनी 72 तासाच्या आत या प्रकरणाचा खुलासा करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. हे प्रकरण भिवानीतील नवा बाजार परिसरातील आहे. इथे राहणारे सतीश आणि ज्योती यांचं 12 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं, दोघांना दोन मुलं आहेत.
कुटुंबातील सर्वजण खूप आनंदी होते. दोघांनी घर बांधण्याचं काम सुरू केलं आणि रोहतास नावाचा 41 वर्षीय व्यक्ती त्यांच्या घरात मजूर म्हणून कामाला आला. यादरम्यान सतीशची पत्नी ज्योतीचे मजूर रोहताससोबत प्रेमसंबंध सुरू झाले.
पत्नीचे अवैध संबंध सतीशला समजताच त्याने विरोध करण्यास सुरुवात केली. मग ज्योती आणि रोहतास यांनी सतीशला मार्गातून हटवण्याची योजना तयार केली.
5 मे रोजी रात्री रोहतासने सतीशला दारू पाजली. त्यानंतर त्याला त्याच्या ई-रिक्षात बसवून गुजराणी रोडवर नेलं. जिथे त्याने सतीशचा पायजमाच्या नाडीने गळा आवळून खून केला.
या प्रकरणी एएसपी लोगेश कुमार यांनी सांगितलं की, सीआयए-1 आणि सायबर पोलीस स्टेशनने तपास करताना दोन्ही आरोपींना 72 तासांत अटक केली.
दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची कोठडी मिळाली. पोलिसांनी सांगितलं की, मृत सतीश हा दोन मुलांचा बाप असून प्रियकर रोहतास अविवाहित आहे.