जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / कोरोना / जगातल्या टॉप 10 Vaccine Women; दोन भारतीय स्त्रियाही आहेत कोरोना लस बनवण्यात अग्रणी

जगातल्या टॉप 10 Vaccine Women; दोन भारतीय स्त्रियाही आहेत कोरोना लस बनवण्यात अग्रणी

प्रत्येक लस (Corona Vaccine) विकसित करण्यात कोणत्या ना कोणत्या महिला शास्त्रज्ञाचाही सहभाग आहे. जगाला कोरोनामुक्त करण्यासाठी धडपडत असलेल्या या शास्त्रज्ञ महिलांपैकी टॉप 10 शास्त्रज्ञांची ही माहिती….

01
News18 Lokmat

डॉ. के. सुमती : भारतात मंजुरी मिळालेली Covaxin ही भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीने तयार केलेली लस विकसित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हैदराबादमध्ये असलेल्या या कंपनीच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाच्या त्या प्रमुख आहेत. याआधी झिका आणि चिकनगुनियाला प्रतिबंध करणाऱ्या लशी विकसित करण्यातही सुमती यांचं योगदान होतं.

जाहिरात
02
News18 Lokmat

सारा गिल्बर्ट : Oxford University आणि Atrazeneca यांच्यातर्फे विकसित करण्यात आलेल्या लसनिर्मितीमध्ये प्रमुख भूमिका होती. वॅक्सिटेक या संस्थेच्या सहसंस्थापक आहेत. त्यांनी विकसित केलेल्या लशीच्या चाचणीमध्ये त्यांची तिन्ही मुलं (तिळी) सहभागी झाली होती. या लसनिर्मितीचं तंत्रज्ञान वापरून भारतात सीरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड लशीची निर्मिती केली आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

नीता पटेल : अमेरिकेतील मेरीलँड येथे मुख्यालय असलेल्या नोवावॅक्स (Novavax) या लसनिर्मिती कंपनीत आघाडीच्या मॉलिक्युलर सायंटिस्ट. ही लसनिर्मिती करणाऱ्या त्यांच्या टीममध्ये सगळ्या महिला शास्त्रज्ञच होत्या. ही लस अद्याप चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे; नीता भारतीय वंशाच्या असून, गुजरातमध्ये त्यांचं गाव आहे. त्यांच्या वडिलांना टीबी झाला होता. त्यामुळे आपण डॉक्टर बनायचं, हे नीता यांनी बालपणीच ठरवलं होतं.

जाहिरात
04
News18 Lokmat

कॅटलिन कॅरिको : हंगेरीच्या या महिला शास्त्रज्ञ 66 वर्षांच्या असून Pfizer & BioNTech या कंपन्यांनी निर्मिती केलेली लस विकसित करण्यात कॅटलिन यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. ही लस 95 टक्के प्रभावी असल्याचा निष्कर्ष क्लिनिकल ट्रायलमध्ये निघाला आहे. लसनिर्मिती करताना आरएनए तंत्रज्ञान वापरण्याची कल्पना अव्यावहारिक असल्याचं मानलं जात होतं; मात्र तेच तंत्र कोरोनाप्रतिबंधक लशीसाठी प्रभावी ठरेल, असा विश्वास कॅटलिन यांना होता. त्यामुळे त्यांनी याच पद्धतीसाठी आग्रह धरला. त्यासाठी अक्षरशः आपलं करिअरच पणाला लावलं. आणि वैशिष्ट्य हे, की ही लस जगभरातल्या लशींमध्ये सर्वांत प्रभावी असल्याचं दिसून आलं.

जाहिरात
05
News18 Lokmat

कॅथरीन जेनसेन : फायझर आणि बायोएनटेक या कंपन्यांची लस विकसित करण्यात कॅथरीन जेनसेन या जर्मन महिला शास्त्रज्ञाची भूमिका महत्त्वाची आहे. झूम मीटिंगमध्ये 650 लोकांच्या टीमशी कायम संपर्कात राहून कॅथरीन अक्षरशः रात्रंदिवस लसनिर्मितीत गढल्या होत्या

जाहिरात
06
News18 Lokmat

ओझलेम टूरेसी : ओझलेम या जर्मन (German) बिझनेसवूमन असून, बायोएनटेक कंपनीत मुख्य चिकित्सा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ओझलेम आणि त्यांचे पती उगुर सहीन या दोघांचाही फायझर-बायोएनटेकच्या लसनिर्मितीत महत्त्वाचा सहभाग होता.

जाहिरात
07
News18 Lokmat

किज्मेकिया कॉर्बेट : आफ्रिकी वंशाच्या अमेरिकी डॉक्टर किज्मेकिया कॉर्बेट या व्हायरॉलॉजिस्ट (Virologist)असून, मेरीलँडमध्ये असलेल्या आरोग्यविषयक राष्ट्रीय संस्थेत (एनआयएच) कार्यरत आहेत. कोरोनाप्रतिबंधक दोन लशी विकसित करण्यासाठी किज्मेकिया यांच्या टीमने मॉडर्ना (Moderna) कंपनीसोबत काम केलं.

जाहिरात
08
News18 Lokmat

लिसा जॅक्सन : अमेरिकेतल्या मॉडर्ना आणि एनआयएच या संस्थांनी विकसित केलेल्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या डॉ. लिसा यांच्या नेतृत्वाखाली पार पडल्या. त्यांच्या कार्याची दखल टाइम मासिकानेही घेतली होती. mRNA-1273 या प्रभावी ठरलेल्या लशीच्या पहिल्या टप्प्यातल्या चाचणीतही लिसा यांची भूमिका महत्त्वाची होती.

जाहिरात
09
News18 Lokmat

हॅनेक शूटमेकर : डच शास्त्रज्ञ असलेल्या हॅनेक 57 वर्षांच्या असून, अॅमस्टरडॅम विद्यापीठाच्या व्हायरॉलॉजी विभागात प्राध्यापक आहेत. जॉन्सन अँड जॉन्सनच्या जेन्सन व्हॅक्सिन कार्यक्रमाच्या आणि विषाणूप्रतिबंधक लस विकसित करण्याच्या कार्यक्रमाच्या त्या जागतिक प्रमुख आहेत. एचआयव्हीच्या लशीवरील संशोधन सुरू ठेवून त्यांनी नेदरलँड्समध्ये कोरोना लशीच्या चाचण्यांमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी निभावली.

जाहिरात
10
News18 Lokmat

एलेना स्मोलयरचक : रशियाच्या (Russian) शास्त्रज्ञ असलेल्या एलेना मॉस्को विद्यापीठात मेडिसिन क्लिनिकल संशोधन केंद्रात संचालक आहेत. स्पुटनिक व्ही या बहुचर्चित लशीची निर्मिती एलेना यांच्या नेतृत्वाखालीच तयार झाली.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 010

    जगातल्या टॉप 10 Vaccine Women; दोन भारतीय स्त्रियाही आहेत कोरोना लस बनवण्यात अग्रणी

    डॉ. के. सुमती : भारतात मंजुरी मिळालेली Covaxin ही भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीने तयार केलेली लस विकसित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हैदराबादमध्ये असलेल्या या कंपनीच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाच्या त्या प्रमुख आहेत. याआधी झिका आणि चिकनगुनियाला प्रतिबंध करणाऱ्या लशी विकसित करण्यातही सुमती यांचं योगदान होतं.

    MORE
    GALLERIES

  • 02 010

    जगातल्या टॉप 10 Vaccine Women; दोन भारतीय स्त्रियाही आहेत कोरोना लस बनवण्यात अग्रणी

    सारा गिल्बर्ट : Oxford University आणि Atrazeneca यांच्यातर्फे विकसित करण्यात आलेल्या लसनिर्मितीमध्ये प्रमुख भूमिका होती. वॅक्सिटेक या संस्थेच्या सहसंस्थापक आहेत. त्यांनी विकसित केलेल्या लशीच्या चाचणीमध्ये त्यांची तिन्ही मुलं (तिळी) सहभागी झाली होती. या लसनिर्मितीचं तंत्रज्ञान वापरून भारतात सीरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड लशीची निर्मिती केली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 010

    जगातल्या टॉप 10 Vaccine Women; दोन भारतीय स्त्रियाही आहेत कोरोना लस बनवण्यात अग्रणी

    नीता पटेल : अमेरिकेतील मेरीलँड येथे मुख्यालय असलेल्या नोवावॅक्स (Novavax) या लसनिर्मिती कंपनीत आघाडीच्या मॉलिक्युलर सायंटिस्ट. ही लसनिर्मिती करणाऱ्या त्यांच्या टीममध्ये सगळ्या महिला शास्त्रज्ञच होत्या. ही लस अद्याप चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे; नीता भारतीय वंशाच्या असून, गुजरातमध्ये त्यांचं गाव आहे. त्यांच्या वडिलांना टीबी झाला होता. त्यामुळे आपण डॉक्टर बनायचं, हे नीता यांनी बालपणीच ठरवलं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 04 010

    जगातल्या टॉप 10 Vaccine Women; दोन भारतीय स्त्रियाही आहेत कोरोना लस बनवण्यात अग्रणी

    कॅटलिन कॅरिको : हंगेरीच्या या महिला शास्त्रज्ञ 66 वर्षांच्या असून Pfizer & BioNTech या कंपन्यांनी निर्मिती केलेली लस विकसित करण्यात कॅटलिन यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. ही लस 95 टक्के प्रभावी असल्याचा निष्कर्ष क्लिनिकल ट्रायलमध्ये निघाला आहे. लसनिर्मिती करताना आरएनए तंत्रज्ञान वापरण्याची कल्पना अव्यावहारिक असल्याचं मानलं जात होतं; मात्र तेच तंत्र कोरोनाप्रतिबंधक लशीसाठी प्रभावी ठरेल, असा विश्वास कॅटलिन यांना होता. त्यामुळे त्यांनी याच पद्धतीसाठी आग्रह धरला. त्यासाठी अक्षरशः आपलं करिअरच पणाला लावलं. आणि वैशिष्ट्य हे, की ही लस जगभरातल्या लशींमध्ये सर्वांत प्रभावी असल्याचं दिसून आलं.

    MORE
    GALLERIES

  • 05 010

    जगातल्या टॉप 10 Vaccine Women; दोन भारतीय स्त्रियाही आहेत कोरोना लस बनवण्यात अग्रणी

    कॅथरीन जेनसेन : फायझर आणि बायोएनटेक या कंपन्यांची लस विकसित करण्यात कॅथरीन जेनसेन या जर्मन महिला शास्त्रज्ञाची भूमिका महत्त्वाची आहे. झूम मीटिंगमध्ये 650 लोकांच्या टीमशी कायम संपर्कात राहून कॅथरीन अक्षरशः रात्रंदिवस लसनिर्मितीत गढल्या होत्या

    MORE
    GALLERIES

  • 06 010

    जगातल्या टॉप 10 Vaccine Women; दोन भारतीय स्त्रियाही आहेत कोरोना लस बनवण्यात अग्रणी

    ओझलेम टूरेसी : ओझलेम या जर्मन (German) बिझनेसवूमन असून, बायोएनटेक कंपनीत मुख्य चिकित्सा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ओझलेम आणि त्यांचे पती उगुर सहीन या दोघांचाही फायझर-बायोएनटेकच्या लसनिर्मितीत महत्त्वाचा सहभाग होता.

    MORE
    GALLERIES

  • 07 010

    जगातल्या टॉप 10 Vaccine Women; दोन भारतीय स्त्रियाही आहेत कोरोना लस बनवण्यात अग्रणी

    किज्मेकिया कॉर्बेट : आफ्रिकी वंशाच्या अमेरिकी डॉक्टर किज्मेकिया कॉर्बेट या व्हायरॉलॉजिस्ट (Virologist)असून, मेरीलँडमध्ये असलेल्या आरोग्यविषयक राष्ट्रीय संस्थेत (एनआयएच) कार्यरत आहेत. कोरोनाप्रतिबंधक दोन लशी विकसित करण्यासाठी किज्मेकिया यांच्या टीमने मॉडर्ना (Moderna) कंपनीसोबत काम केलं.

    MORE
    GALLERIES

  • 08 010

    जगातल्या टॉप 10 Vaccine Women; दोन भारतीय स्त्रियाही आहेत कोरोना लस बनवण्यात अग्रणी

    लिसा जॅक्सन : अमेरिकेतल्या मॉडर्ना आणि एनआयएच या संस्थांनी विकसित केलेल्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या डॉ. लिसा यांच्या नेतृत्वाखाली पार पडल्या. त्यांच्या कार्याची दखल टाइम मासिकानेही घेतली होती. mRNA-1273 या प्रभावी ठरलेल्या लशीच्या पहिल्या टप्प्यातल्या चाचणीतही लिसा यांची भूमिका महत्त्वाची होती.

    MORE
    GALLERIES

  • 09 010

    जगातल्या टॉप 10 Vaccine Women; दोन भारतीय स्त्रियाही आहेत कोरोना लस बनवण्यात अग्रणी

    हॅनेक शूटमेकर : डच शास्त्रज्ञ असलेल्या हॅनेक 57 वर्षांच्या असून, अॅमस्टरडॅम विद्यापीठाच्या व्हायरॉलॉजी विभागात प्राध्यापक आहेत. जॉन्सन अँड जॉन्सनच्या जेन्सन व्हॅक्सिन कार्यक्रमाच्या आणि विषाणूप्रतिबंधक लस विकसित करण्याच्या कार्यक्रमाच्या त्या जागतिक प्रमुख आहेत. एचआयव्हीच्या लशीवरील संशोधन सुरू ठेवून त्यांनी नेदरलँड्समध्ये कोरोना लशीच्या चाचण्यांमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी निभावली.

    MORE
    GALLERIES

  • 10 10