नुकताच बारावीचा निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरचं हे अत्यंत महत्त्वपूर्ण वळण असतं. यावेळी कोणता कोर्स निवडायचा असा प्रश्न सर्वच पालक आणि विद्यार्थ्यांसमोर असतो. विद्यार्थ्यांना झेपेल आणि आवड असणारा कोर्स निवडणं खूप कठीण असतं. अशा वेळी योग्य मार्गदर्शन खूप गरजेचं असतं. यासाठीच आज आपण अशाच सहा टिप्स पाहणार आहोत. ज्यामुळे बारावी पास विद्यार्थी आणि पालकांना कोर्स निवडणं सोपं होईल.
स्वतःचं मूल्यांकन करा : विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम स्वतःचं आकलन करायला हवं. हे त्यांच्या मार्कांवरुन कळतं. यासोबतच स्वतःला काही प्रश्न विचारणं गरजेचं असतं. जकं की, तुम्ही कोण आहात, तुम्हाला काय आवडतं आणि कोणत्या विषयात तुम्ही बेस्ट आहात. यामुळे तुम्हाला करियर निवडण्यात मदत होईल. कारण तुमचा इंट्रेस्ट ज्या विषयात असेल तो तुम्ही निवडू शकाल. अशा करियअरमध्ये तुम्ही यशस्वी देखील होऊ शकता.
आवडत्या विषयांची यादी तयार करा : कॉलेजमध्ये अॅडमिशन घेण्यापूर्वी आपल्या आवडत्या सब्जेक्ट आणि फिल्ड्सची यादी तयार करा. यामुळे तुम्हाला करियरचे पर्याय पाहण्यास मदत होईल. या आधारावर तुम्ही तुम्हाला इंट्रेस्ट असणाऱ्या 10-15 किरयरचे पर्याय नोट करु शकता.
योग्य कोर्सची निवड : प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या विषयात हुशार असतोच. तुम्हालाही जो विषय चांगला आहे असा वाटतो त्याच कोर्सची निवड करा. सध्याच्या काळात असे अनेक कोर्स आहेत जे तुम्ही करियरनुसार बदलू शकता. यासाठी तुम्ही महागड्या कॉलेजमध्येच प्रवेश घेणं गरजेचं नसतं. शिक्षणासाठी अनेक ऑप्शन आहेत. तुम्ही कोणत्याही संस्थानाकडून डिग्री कोर्स, डिप्लामा कोर्स, वीकेंड कोर्स, डिस्टेंस लर्निंग कोर्स करु शकता. अॅडमिशन घेण्यापूर्वी तुम्ही तिथे शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांसोबत चर्चा करुन माहिती घेऊ शकता. सिलॅबस स्कोप काय आहे ते तुम्हाला माजी विद्यार्थी चांगल्या प्रकारे सांगू शकता.
उत्कृष्ट करिअर ग्रोथची शक्यता पाहा : कोणत्याही कॉलेजमध्ये किंवा कोर्समध्ये प्रवेश घेण्यापूर्वी, त्या कोर्समध्ये करिअरची ग्रोथ कशी आहे ते तपासून ग्या. तुम्ही ऑफबीट कोर्स निवडत असाल, तर भविष्यात त्याचा विस्तार आणि ग्रोथच्या शक्यतांचा नीट विचार करा, यासोबतच त्या क्षेत्रात नोकरी मिळण्याच्या किती संधी आहेत हे देखील पहा. त्यासोबतच त्या संबंधित कोर्समध्ये हायर स्टडीज घेण्याची शक्यता आहे का, हेही पाहायला हवे.
दबावाखाली कोर्स निवडू नका : अॅडमिशन घेताना पालकांच्या दबावाखाली कोणताही अभ्यासक्रम किंवा संस्थान निवडू नका. यामुळे तुमचं भविष्य धोक्यात येईल. तुम्ही ज्या कोर्स किंवा इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेत आहात त्या संस्थेची मान्यता, फॅकल्टी आणि प्लेसमेंट परफॉर्मेंसची माहिती अवश्य घ्या. तुमची आवड आणि भविष्यातील शक्यता लक्षात घेऊन तुम्ही कोर्स निवडा. असं केल्यास तुमचं भविष्य करिअरच्या दृष्टीने खूप उज्ज्वल असेल.
निवडलेले करिअर ऑप्शन तपासा : तुम्ही कोर्स आणि करिअर पर्याय निवडल्यास, किमान पात्रता, फायदे आणि तोटे, पगार आणि विकासाच्या संधी यासारख्या विविध पॅरामीटर्सवर विश्लेषण करा. तसेच, त्या करिअरमध्ये आधीच काम करत असलेल्या लोकांसोबत चर्चा करा. यामुळे तुम्हाला त्या क्षेत्राबद्दल अधिक ज्ञान मिळेल. म्हणजेच तुम्हाला सीए व्हायचे असेल तर कोणत्याही सीएला भेटा आणि त्याच्याशी त्याच्या कामाबद्दल आणि करिअरच्या ग्रोथविषयी बोला.