हे नवीन वर्ष अनेक राशींसाठी शुभ असणार आहे. या दिवसापासून चैत्र नवरात्रीलाही सुरुवात होत आहे. हे नवीन वर्ष कोणत्या राशींसाठी सर्वात शुभ असेल, याविषयी झाशीचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित मनोज थापक यांनी दिलेली माहिती पाहुया.
मिथुन - नववर्षारंभाचा सर्वाधिक फायदा मिथुन राशीच्या लोकांना होईल, असे पंडित मनोज थापक यांनी सांगितले. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यक्तिमत्व वरचढ राहील, कामांमध्ये सातत्य राहील. अनेक उपलब्धी तुमच्या नावावर येतील. न डगमगता पुढे जाल. अनेक क्षेत्रात कार्याचा विस्तारही होईल.
सिंह - नवीन वर्षात सिंह राशीच्या लोकांचे लक्ष पुण्य कर्मांवर राहील. या वर्षी कामाच्या ठिकाणी मोठ्या अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी आणि कामात सुधारणा होण्यास मदत होईल. भागीदारीत काम करणाऱ्या लोकांना फायदा होईल. धार्मिक सहलींचा योगायोगही यावर्षी घडत आहे.
तुळ - यावर्षी तुळ राशीच्या लोकांसाठी विवाहाची शक्यता निर्माण झाली आहे. कौटुंबिक जीवनात सुसंवाद येईल. मित्र आणि सहकाऱ्यांकडून लाभ होईल. जर केस-खटले चालू असतील तर ते संपण्याची शक्यता आहे. अभ्यास आणि अध्यापन क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाही या वर्षी खूप फायदा होईल.
धनु - धनु राशीच्या लोकांसाठी हे वर्ष खूप फायदेशीर असेल. शैक्षणिक आणि स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात तयारी करणाऱ्यांना या वर्षी यश मिळू शकते. मुले होऊ इच्छिणाऱ्या लोकांना अपत्य प्राप्ती होऊ शकते. तुमचे बोलणे आणि वागणे तुम्हाला या वर्षात पुढे घेऊन जाईल. म्हणूनच तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे वर्तन साधे ठेवा. (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)