
मेष - आज अमावस्येचा चंद्र तुमच्या राशीच्या चवथ्या भावात आहे. आजचा दिवस संमिश्र असेल. एखादी नकळत सूचना तुम्हाला मिळेल. आज कुटुंबातल्या लोकांसोबत तुम्ही थोडे बेचैन राहाल. जोडीदाराबरोबर भांडण होऊ शकतं.

वृषभ - आज अंशिक सूर्यग्रहण आहे. अमावस्येचा चंद्र तुमच्या राशीच्या तिसऱ्या भावात आहे. तुम्ही आज एकदम सकारात्मक राहाल. पण आज तुमचा फोन, इंटरनेट कनेक्शन, कम्प्युटर ही उपकरणं बिघडू शकतात.तुमचे आई-वडील, भाऊ-बहीण तुम्हाला आज व्यस्त ठेवू शकतात.

मिथुन - चंद्र तुमच्या धन, कुटुंब स्थानी आहे. तुम्हाला आज तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवावं लागेल. मनात नैराश्यपूर्ण विचार येतील. याचा परिणाम तुमच्या यशावर होईल.

कर्क - सूर्य, बुध, चंद्र, राहू तुमच्या राशीत आहे. मंगळ आणि केतू तुमच्या राशीच्या समोर आहे. आज तुमच्या आयुष्यात बदल होऊ शकतात. तुम्ही आज शांत आणि सकारात्मक राहा. काही संधी निसटू शकतात.

सिंह - आज सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडे असेल. तुम्ही आज कुठली चूक तर करत नाहीत ना, याकडे लक्ष असेल. यात कोणाचा फार दोष नसेल. तुम्हीही तुमच्याकडेच जास्त लक्ष द्याल.

कन्या - आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुम्हाला आजचा दिवस लाभदायक असेल. तुम्ही आज गोड बोलाल. तुमचा आत्मविश्वास मोठा असेल. मित्रांसोबत आनंदी राहाल. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. तुम्ही आज भविष्याचं कुठलं नियोजन कराल.

तूळ - आजचा दिवस खूप चांगला आणि फायदेशीर आहे. पैशाच्या दृष्टीनं आजचा दिवस सकारात्मक असेल. तुम्हाला भूतकाळातल्या काही अनुभवांचा फायदा होईल.

वृश्चिक - आज चंद्र तुमच्या लाभ स्थानी आहे. तुम्ही शांततेनं काम केलंत तर यश मिळेल. नोकरीत नवी संधी चालून येईल. थोडा चढउतार जाणवेल. पण शेवटी सकारात्मक होईल.

धनू - आज तुम्हाला काही आव्हानांना तोंड द्यावं लागेल. काही चिंता जाणवेल. कामात तुमचं लक्ष कमी लागेल. आज कुठला मोठा निर्णय घेऊ नका. जास्त वेळ घरीच घालवा.

मकर - आजचा दिवस चांगला आहे. तो एकदम आरामात जाईल. दिवसभर अनुकूल वातावरण राहील. तुमची कामं पूर्ण होतील. तुमची क्षमता सिद्ध होऊ शकेल. आज तुम्ही नवी नोकरी, पगारवाढ याची अपेक्षा ठेवू शकाल.

कुंभ - आज तुमच्या प्रतीपथावर येणाऱ्या सर्व अडचणींना ग्रहण लागेल. तुम्ही आज अनिर्बंध प्रगती करू शकाल. तुम्हाला आज कसला तरी राग येईल. पण तुमचा सन्मान, धन प्रतिष्ठा यात वृद्धी होईल.

मीन - आज तुमची रास पंचमात आहे.नोकरीत परिवर्तन येण्याचे संकेत मिळतील. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. पैशाबद्दल चिंता राहील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.