बाहुबली या सिनेमाच्या यशानंतर प्रभासच्या प्रसिद्धीत कमालीची वाढ झाली. यानंतर प्रभास आणि अनुष्का शर्मा यांच्या रिलेशनशिपविषयीच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र, आता समोर आलेली ही बातमी प्रभासच्या चाहत्यांसाठी आश्चर्याचा धक्का असणार आहे.
प्रभास अभिनेत्री अनुष्का शेट्टीसह नाही तर दुसऱ्याच मुलीसह विवाहबंधनात अडकणार आहे. ही मुलगी एनआयआर आहे.
प्रभास आणि अनुष्काची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत असली तरी लग्नगाठ मात्र तो अनुष्कासोबत नाही तर एनआयआर म्हणजेच अनिवासी भारतीय मुलीसोबत तो विवाहबंधनात अडकणार आहे.
प्रभासची होणारी पत्नी ही अमेरिकेतील एका सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाची मुलगी आहे. त्यांचं लग्न लव मॅरेज नसून अरेंज मॅरेज आहे. प्रभासनं या लग्नाला होकार दिला असल्याची माहिती समोर येत आहे.
प्रभास सध्या आपल्या आगामी राधे श्याम सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा सिनेमा 14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
राधे श्याम या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर प्रभासच्या लग्नाविषयीची घोषणा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, या बातमीला अद्याप प्रभास किंवा त्याच्या कुटुंबीयांनी दुजोरा दिलेला नाही.