आज आपल्या देशाचा 74 व्या स्वातंत्र्यदिन. कोरोनाच्या संकटाशी सामना करत यंदाचा स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा केला जात आहे. इंडो-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) जवानांनी स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे. लडाखमध्ये 17,000 फूट उंचीवर तिरंगा झेंडा फडकावून जवानांनी स्वातंत्र्य दिन साजरा केला. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत भारतीय जवान इंडो तिबेड सीमेवर आपले कर्तृव्य बजावत असतात. यंदाच्या स्वातंत्र्य दिनावर कोरोनाचं सावट असल्याचं पाहायला मिळत आहे. लडाखमध्ये जवानांनी सोशल डिस्टन्सिंग पाळत झेंडा फडकावला आहे. जवानांनी मास्क घालून कोरोनाशी लढ्याबद्दल संदेश दिला आहे.