दिवंगत अभिनेता राजीव कपूर (Rajiv Kapoor) यांच्या निधनामुळं बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. राजीव कपूर जवळपास तीन दशकांनंतर तुलसीदास जूनियर (Toolsidas Junior) या सिनेमातून बॉलिवूड वापसीसाठी सज्ज झाले होते. मात्र, नियतीनं दुसरंच काहीतरी केलं. राजीव कपूर यांच्यासारखेच इतरही अनेक कलाकार आहेत, जे आपला शेवटचा सिनेमा नाही पाहू शकले. यातील बहुतेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट झालेत. जाणून घेऊया अशा कलाकारांबद्दल जे स्वतःचाच शेवटचा चित्रपट नाही पाहू शकले.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्यने संपूर्ण देश हादरला होता. दिल बेचारा (Dil Bechara) या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या काही दिवस आधीच सुशांतनं या जगाचा निरोप घेतला. सुशांतचा हा सिनेमा 24 जुनला प्रदर्शित झाला होता आणि सुशांतचा 14 जुनला मृत्यू झाला होता.
प्रसिद्ध अभिनेते ओम पुरी (Om Puri) यांचं निधन 6 जानेवारी 2017 ला झालं होतं. मृत्यूच्या एक महिना आधीच त्यांनी सलमान खानच्या ट्यूबलाईट सिनेमातील आपलं चित्रीकरण पूर्ण केलं होतं. हा सिनेमा त्यांच्या निधनानंतर 25 जून 2017 ला प्रदर्शित झाला.
9 फेब्रुवारी 2021ला राजीव कपूर (Rajiv Kapoor) यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते जवळपास तीन दशकानंतर तुलसीदास जुनियर (Toolsidas Junior) सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये वापसी करणार होते. पुढील काही दिवसांमध्ये यासंदर्भात बातचीत करण्याचा विचारही त्यांनी केला होता.
बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना(Rajesh Khanna) यांचं 18 जुलै 2021 ला कर्करोगामुळं निधन झालं. त्यांचा शेवटचा सिनेमा रियासत (Riyasat) 2014 मध्ये प्रदर्शित झाला.
बॉलिवूड कलाकार शम्मी कपूर(Shammi Kapoor) यांचं आपल्या शेवटच्या रॉकस्टार (Rockstar)सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच निधन झालं. 14 ऑगस्ट 2011 ला त्यांनी दुनियेता निरोप घेतला आणि त्यांता शेवटचा सिनेमा याच वर्षी 9 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला.
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी (SRIDEVI)यांचा 24 फेब्रुवारी 2018रोजी दुबईच्या एका हॉटेलमध्ये मृत्यू झाला. त्यांनी 2018 मध्ये आलेल्या जीरो (Zero) सिनेमात छोटीशी भूमिका साकारली होती.
1993 मध्ये दिव्या भारती (Divya Bharti) यांचं अचानक निधन झाल्यानं बॉलिवूड हादरलं होतं. त्या केवळ 19 वर्षांच्या होत्या. त्यांचा शेवटचा सिनेमा शतरंज त्याच वर्षी प्रदर्शित झाला आणि प्रचंड गाजला.
अभिनेत्री स्मिती पाटील (Smita Patil) यांनी खूप कमी वेळात आपली ओळख निर्माण केली होती. स्मिता यांचं निधन मुलगा प्रतिक बब्बरच्या जन्मानंतर 2 आठवड्यात 12 डिसेंबर 1986 रोजी झालं. त्यांचा शेवटचा सिनेमा गोलियों का बादशाह 17 मार्च 1989ला प्रदर्शित झाला.
सुंदरतेची देवी मानल्या जाणाऱ्या मधुबाला (Madhubala)यांनी 23 फेब्रुवारी 1969 मध्ये शेवटचा श्वास घेतला. त्यांचा शेवटचा सिनेमा ज्वाला (Jwala) 1971 मध्ये प्रदर्शित झाला.