महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. मुंबईलाही कोरोनाचा विळखा बसला आहे. आता या कोरोनाला हुसकावून लावण्यासाठी मुंबई पालिकेनं 'रोबोट'ला बोलावलं आहे.
मुंबई शहरात काही ठिकाणी खूप दाटीवाटीची लोकवस्ती आहे तर काही ठिकाणी वसाहती अशा सर्वच भागांचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी मुंबई फायर ब्रिगेड खूप वेगवेगळ्या प्रकारची वाहने वापरत आहेत.
आपल्या जीवाची बाजी लावून अग्निशमन दलाचे अधिकारी ज्या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळला जिथे फवारणी करत आहे.
त्यानंतर आता मुंबईत ही मशीन निर्जंतुकीकरणासाठी वापरले जाते आहे. त्याची प्रात्यक्षिकं भायखळा फायर स्टेशन येथे घेण्यात आली होती.