जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / Chandrapur: डोकं छाटलेल्या तरुणीची ओळख पटली, चंद्रपूर जिल्ह्यात नग्नावस्थेत आढळला होता मृतदेह

Chandrapur: डोकं छाटलेल्या तरुणीची ओळख पटली, चंद्रपूर जिल्ह्यात नग्नावस्थेत आढळला होता मृतदेह

Chandrapur: डोकं छाटलेल्या तरुणीची ओळख पटली, चंद्रपूर जिल्ह्यात नग्नावस्थेत आढळला होता मृतदेह

भद्रावती येथे मुंडकं नसलेला आणि नग्नावस्थेत आढळलेल्या मुलीच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. (Identity of dead body bhadravati) पाच दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोठं यश मिळाले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

चंद्रपूर, 9 एप्रिल : भद्रावती येथे मुंडकं नसलेला आणि नग्नावस्थेत आढळलेल्या मुलीच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. (Identity of dead body bhadravati) पाच दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोठं यश मिळाले आहे. परिवारापासून वेगळी राहत होती मुलगी? मृत मुलगी नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक येथील रहिवासी, गुडिया उर्फ रितिका तिवारी (२२), असे या मुलीचे नाव आहे. मृत मुलगी परिवारापासून वेगळी राहत असल्यामुळे तिच्या मिसिंगची कुठेही तक्रार नव्हती. मात्र, पोलिसांनी खबरींच्या माध्यमातून मुलीची ओळख पटवली. मात्र, मुलीच्या खुनाचे आरोपी, ठिकाण आणि उद्देश्याबाबत अजूनही खुलासा झालेला नाही. तरी या प्रकरणाचा लवकरच खुलासा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. हेही वाचा -  कोरोनाच्या XE व्हेरिएंटची ‘या’ राज्यात एन्ट्री, आढळला रुग्ण काय आहे घटना?  एका तरुणीचं डोकं छाटलेला मृतदेह हा नग्नावस्थेत आढळून आल्याची (young girl naked dead body found) माहिती समोर आली होती. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात  घडली. (Bhadravati city of Chandrapur) भद्रावतीच्या ITI च्या मागील भागात तरुणीचा मृतदेह आढळून आल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलीस पथक फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. या युवतीचे डोके निर्दयपणे छाटल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर पोलीस अधिक्षक स्वतः घटनास्थळी पोहचले. या संवेदनशील घटनेच्या तपासासाठी पुराव्याची शोधमोहीम सुरू झाली आहे. मृत युवतीसोबत कोणी तिच्यासोबत हे घृणास्पद कृत्य केले याबाबत अद्याप अनभिज्ञता आहे. आरोपीला शोधणे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात