बुलडाणा, 25 जून : पीक कर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या दाताळा इथल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा शाखाधिकारी राजेश हिवसेला नागपुरातून अटक करण्यात आलीय. मलकापूर तालुक्याच्या दाताळा गावातील सेंट्रल बँकेच्या शाखाधिकारी राजेश हिवसे याने पीक कर्ज मागणीसाठी आलेल्या शेतकरी दाम्पत्याकडून पीक कर्ज प्रकरणासाठी त्यांचा मोबाईल नंबर मिळवून फोनवर शेतकऱ्याच्या बायकोकडे शरीरसुखाची मागणी केली होती.
पीक कर्जासाठी बँक मॅनेजरची शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी
हा संतापजनक प्रकार एवढ्यावरच न थांबता या महाशयांनी आपल्या बँकेचे शिपाई मनोज चव्हाण यांना महिलेकडे पाठवून पीक कर्ज तर देतोच शिवाय वेगळा पॅकेजही देतो असल्याचं सांगितलं. या महिलेने मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये शाखाधिकारी हिवसे आणि शिपाई चव्हाण यांच्या विरोधात तक्रात दाखल केली होती. हिवसे विरोधात पोलिसांत तक्रार दाखत होताच फरार झाला होता. अखेर आज रात्री पोलिसांनी नागपुरातून त्याच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी शेतकऱ्याने मलकापूर पोलिसात तक्रार नोंदविली होती. घटनेनंतर आरोपी बँक व्यवस्थापक राजेश हिवसे आणि शिपाई मनोज चव्हाण फरार झाला होता. पोलिसांनी शिपायास दोन दिवसापूर्वीच अटक केली आहे.

)







