मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Working Parents ना मुलांसोबत Quality Time घालवायचा असेल तर ही 4 कामे महत्त्वाची

Working Parents ना मुलांसोबत Quality Time घालवायचा असेल तर ही 4 कामे महत्त्वाची

दैनंदिन कामातून वेळ काढून मुलांशी असलेलं नातं कसं दृढ करता येईल, यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्याविषयीच्या काही टिप्स पाहू या.

दैनंदिन कामातून वेळ काढून मुलांशी असलेलं नातं कसं दृढ करता येईल, यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्याविषयीच्या काही टिप्स पाहू या.

दैनंदिन कामातून वेळ काढून मुलांशी असलेलं नातं कसं दृढ करता येईल, यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्याविषयीच्या काही टिप्स पाहू या.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • New Delhi, India

  मूल घडवण्यासाठी त्याला वेळ देणं गरजेचं असतं. सध्या आई-वडील दोघंही नोकरी किंवा व्यवसाय करत असल्यानं मुलांना पालकांचा वेळ मिळणं कठीण झालं आहे. अशा वेळी मुलं आत्ममग्न होऊ शकतात. तसंच मुलं आणि पालकांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. याचा गंभीर परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होऊन त्यांचं भविष्य खराब होऊ शकतं. म्हणूनच दैनंदिन कामातून वेळ काढून मुलांशी असलेलं नातं कसं दृढ करता येईल, यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्याविषयीच्या काही टिप्स पाहू या.

  मुलांसोबत जेवा -

  आई-वडिलांचा सगळा दिवस ऑफिसमध्ये जातो, तर मुलं शाळेत असतात. रात्री जेवणाच्या वेळी सगळं कुटुंब एकत्र असतं. अशा वेळी आवर्जून मुलांसोबत जेवा. यामुळे दिवसभरात घडलेल्या गोष्टींविषयी मुलं तुमच्याशी बोलतील. पेरेंट्स डॉट कॉममधल्या एका लेखानुसार, मुलांसोबत एकत्र जेवल्यानं मुलं त्यांच्या मनातलं बोलतात व व्यक्त होऊ लागतात.

  मुलांसोबत वॉकला जा -

  रात्री जेवण झाल्यावर शतपावली करण्याच्या निमित्तानं मुलांसोबत वेळ व्यतीत करता येऊ शकतो. कामाच्या व्यापामुळे मुलांना शाळेत सोडणं, आणणं किंवा इतर गोष्टींमध्ये मुलांच्या सोबत असणं शक्य होत नाही. अशा वेळी रात्री मुलांसोबत फिरायला गेल्यामुळे आणखी थोडा वेळ मुलांसोबत व्यतीत करता येईल. यामुळे तुमचं एकमेकांसोबतचं नातं दृढ होईल.

  घरच्या कामात मुलांची मदत घ्या -

  मुलांना सतत काही तरी नवं शिकायचं असतं. त्याच त्या गोष्टींमध्ये मुलांचं मन रमत नाही. त्याच वेळी पालकांना घरातली कामं करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. या दोन्हीची सांगड घातली, तर मुलांना थोडा वेळ देता येईल. मुलांना घरकामात सोबत घेतलं तर मुलांना काही वेगळं केल्याचं समाधान मिळेल व पालकांनाही मुलांसोबत वेळ घालवता येईल. केवळ घरकामच नाही, तर घराची सजावट, खरेदी किंवा मिळून करता येणारी घरातली छोटी छोटी कामं यात मुलांना सोबत घ्या.

  हेही वाचा - Chanakya Niti : लहान मुलांच्या उत्तम भविष्यासाठी पालकांनी टाळाव्यात `या` गोष्टी

  मुलांसोबत खेळा -

  मुलांना वेळ देताना तो भरपूर असण्यापेक्षा दर्जेदार असेल, याकडे लक्ष द्या. मुलांच्या खेळामध्ये सहभागी झालं, तर मुलं अतिशय आनंदी होतात. मुलांसोबत मूल होऊन खेळणं, वेळप्रसंगी हार पत्करून मुलांना जिंकण्याचा आनंद देणंही महत्त्वाचं असतं. यामुळं मुलं तुमच्याशी मनमोकळेपणानं बोलतील. संपूर्ण दिवस मुलांसोबत व्यतीत करणं शक्य नसल्याने दिवसातला थोडा वेळ गमतीजमती करून, खेळून मुलांसोबत व्यतीत केला, तर त्यामुळे तुमचं मुलांसोबतचं नातं घट्ट होईल.

  मुलं पालकांकडे तक्रार करतात, की तुम्ही माझ्यासाठी काहीच करत नाही. पालकांना असं वाटतं, की काम करून पैसे मिळवतो, ते मुलांसाठीच. मुलांना घडवताना पैशांसोबतच मुलांना वेळही द्यावा लागतो. काम करणाऱ्या पालकांनी मुलांसोबत चांगल्या प्रकारे वेळ कसा व्यतीत करता येईल, याचा विचार केला पाहिजे.

  First published:

  Tags: Lifestyle, Parents, Parents and child