मानवी जीवनाविषयी अनेक प्राचीन ग्रंथांमधून मार्गदर्शन करण्यात आलं आहे. माणसानं जीवनात कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या टाळाव्यात, वर्तणूक कशी असावी याविषयी सखोल माहिती निरनिराळ्या ग्रंथांमधून देण्यात आली आहे. आचार्य चाणक्य यांचा नीतिशास्त्र हा ग्रंथ त्यापैकीच एक होय. या ग्रंथात मानवी जीवनाविषयीचं तत्त्वज्ञान सांगण्यात आलं आहे. घरातील मोठ्या व्यक्ती बऱ्याचदा लहान मुलांसमोर नकळत वाद-विवाद, खोटं बोलणं यांसारख्या काही गोष्टी करत असतात. पण घरात अशा गोष्टी करताना त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. किंबहुना अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत, असं आचार्य चाणक्य सांगतात. कारण या गोष्टींचा परिणाम घरातल्या लहान मुलांवर होत असतो. भविष्यात मुलंदेखील पालकांसोबत अशा पद्धतीनं वागू शकतात. त्यामुळे घरातल्या मोठ्या व्यक्तींनी लहान मुलांसमोर कोणत्या गोष्टी टाळाव्यात या संदर्भातील ज्ञान आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्र या ग्रंथात मांडलं आहे. `टीव्ही नाइन हिंदी`ने या विषयी माहिती दिली आहे. आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्र या ग्रंथात मानवी जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख आहे. सध्याच्या काळात मुलांचं संगोपन हा प्रत्येक पालकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मुलांचं संगोपन व्यवस्थित व्हावं, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे, त्यांनी उत्तम शिक्षण घेऊन जीवनात यशस्वी व्हावं, असं पालकांना वाटतं. या दृष्टीने पालक प्रयत्नशील असतात. परंतु, काहीवेळा कौटुंबिक वादविवाद, पालकांमधला परस्पर विसंवाद आदी गोष्टींचा घरातील मुलांवर नकळत परिणाम होतो. घरातील मोठ्या व्यक्तींनी लहान मुलांसमोर काही गोष्टी करताना सावधगिरी बाळगावी, असं आचार्य चाणक्य सांगतात. आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, घरातल्या मोठ्या व्यक्तींनी लहान मुलांसमोर कधीही अपशब्द वापरू नयेत. लहान मुलं समोर असताना जाणीवपूर्वक भाषा चांगली असावी. कारण लहान मुलं मोठ्या व्यक्तींचं अनुकरण करत असतात. हेही वाचा - Tulsi Vivah 2022 : तुळशीच्या लग्नाला काय काय लागतं? तुळशी विवाह पूजा सामग्री यादी इथं पाहा घरातील लहान मुलांसमोर कधीही खोटं बोलू नये, असं आचार्य चाणक्य सांगतात. यामुळे मुलांच्या नजरेतून तुमचा आदर कमी होतो. त्यामुळे मुलांसमोर खोटं बोलणं टाळावं. आचार्य चाणक्य यांच्या मते, आई-वडिलांनी मुलांसमोर एकमेकांच्या त्रुटी काढू नयेत किंवा त्यावर भाष्य करू नये. असं केल्यानं मुलांच्या नजरेतून तुमचा आदर कमी होतो आणि मुलंदेखील त्याप्रमाणे वागतात. आई-वडिलांनी मुलांसमोर एकमेकांचा आदर, सन्मान करावा. एकमेकांचा अपमान होईल, असं बोलू नये. या गोष्टी केल्याने मुलंदेखील तुमचा आदर करतील, सन्मान ठेवतील. किंबहुना अशा संस्कारांमुळे मुलांना इतर व्यक्तींचा आदर ठेवण्याची शिकवण मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.