मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Shocking! कुटुंबातील 5 जणांची सामूहिक आत्महत्या; 2 महिन्यांपूर्वी पत्नीचा black fungusने झाला होता मृत्यू

Shocking! कुटुंबातील 5 जणांची सामूहिक आत्महत्या; 2 महिन्यांपूर्वी पत्नीचा black fungusने झाला होता मृत्यू

2 महिन्यांपूर्वीच या व्यक्तीच्या पत्नीचा black fungus मुळे मृत्यू झाला होता.

2 महिन्यांपूर्वीच या व्यक्तीच्या पत्नीचा black fungus मुळे मृत्यू झाला होता.

2 महिन्यांपूर्वीच या व्यक्तीच्या पत्नीचा black fungus मुळे मृत्यू झाला होता.

  • Published by:  Meenal Gangurde

कर्नाटक, 24 ऑक्टोबर : ब्लॅक फंगसमुळे (black fungus) पत्नीच्या मृत्यूमुळे धक्का बसलेल्या एका सेवा निवृत्त सैनिक आणि त्याच्या पाच मुलांनी आत्महत्या (Suicide) केली आहे. ही धक्कादायक घटना हुक्केरी तालुक्यातील एका गावातील आहे. पोलिसांनी शनिवारी याबद्दल माहिती दिली.

पोलिसांनी सांगितलं की,गोपाळ हदिमानी (46) आणि त्यांची चार मुलं सौम्या (19), श्वेता (16), साक्षी (11) आणि सृजन हदिमानी (8) यांनी शुक्रवारी रात्री विष घेऊन आत्महत्या केली. शेजारच्यांना सकाळी घरातील एकही सदस्य दिसला नाही, म्हणून त्यांना शंका आली आणि त्यांनी पोलिसांना याबाबत सूचना दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल आहे. (Wife dies of black fungus The grieving husband took the last step with 4 children)

तोपर्यंत कुटुंबीयांचे नातेवाईकही आले होते. त्यांनी सांगितलं की, हदिमानीची पत्नी जुलैमध्ये कोविड-19 नंतर ब्लॅक फंगस या आजाराने त्रस्त होती. यातच तिचा मृत्यू झाला.

हे ही वाचा-मर्डर-2 चित्रपटातून घेतली आयडिया; तांत्रिकाच्या म्हणण्यावरुन कॉलगर्लचा दिला बळी

त्यांनी पुढे सांगितलं की, पत्नीच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्याच्यावर मोठा आघात झाला होता. यासंबंधित एका व्यक्तीने सांगितलं की, तो आणि त्याची मुलं वारंवार आईची आठवण काढत. आणि तिच्याशिवाय जगू शकणार नसल्याचं म्हणत राहात. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Crime news, Karnataka, Suicide