Home /News /news /

1000 कोटी कोणाचे? Income Taxच्या छापेमारीत मोठा घोटाळा उघड; अधिकाऱ्यांनाही फुटला घाम

1000 कोटी कोणाचे? Income Taxच्या छापेमारीत मोठा घोटाळा उघड; अधिकाऱ्यांनाही फुटला घाम

आयकर विभागाने हा मोठा घोटाळा उघड केला आहे. 1000 कोटी ही मोठी रक्कम आहे

    बंगळुरु, 8 नोव्हेंबर : देशात सुरू असलेला आर्थिक घोटाळा उघड करणे व काळा पैशावर नियंत्रण आणण्याचे काम आयकर म्हणजेच इनकम टॅक्स विभागाकडून केले जाते. या महिन्याच्या 4 तारखेला असाच एक मोठा घोटाळा उघड झाला आहे.  इनकम टॅक्‍स विभागाने (Income Tax Dept) चेन्नईच्या एका आयटी इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर ग्रुपशी संबंधित प्रकरणात मदुराई, चेन्नईसह पाच ठिकाणी छापेमारी करीत मोठ्या घोटाळ्याचा खुलासा केल्याचा दावा केला आहे. विभागाने सांगितले की, तपासात तब्बल 1000 कोटी रुपये जप्त करण्यात आले असून ज्याचा खर्च उपलब्ध नाही. हे छापे 4 नोव्हेंबर रोजी मारण्यात आले. इनकम टॅक्‍स (आईटी) विभागाने दावा केला आहे की त्यांना सिंगापूरमध्ये रजिस्टर केलेल्या कंपनीच्या संशयास्पद गुंतवणुकीशीसंबंधित महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. याशिवाय आणखी दोन कंपन्या या ग्रुपमध्ये शेअर होल्डर म्हणून आहेत. यापैकी एका ग्रुपची चौकशीची सुरुवात यापूर्वीच आयटी विभागाच्या टीमने केली आहे. दुसरी शेअर होल्डर कंपनी एक प्रसिद्ध इन्फ्रास्टक्चर डेव्हलपमेंट आणि फायडेन्शल ग्रुपची सहयोगी आहे. हे ही वाचा-कंगनाची टिवटिव सुरू; थेट अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांवरच साधला निशाणा चेन्नई आणि मदुराईमध्ये 5 ठिकाणी छापेमारी आयटी विभागाचे म्हणणे आहे की, ज्या कंपनीवर छापा मारण्यात आला त्याच्याजवळ 72 टक्के शेअर्स आहे. तर ही गुंतवणूक कमी आहे. इतर शेअर्स दुसऱ्या कंपनीजवळ आहे. आणि त्यांची गुंतवणूक जास्त आहे. विभागाकडून सांगण्यात आले की, या प्रकारे साधारण 7 कोटी सिंगापूर डॉलरचा फायदा करण्यात आला आहे. हे साधारण 200 कोटी भारतीय रुपयांइतके आहे. मात्र कंपनीने याबाबत अद्याप माहिती दिलेली नाही. इनकम टॅक्स विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार विभागाने 4 नोव्हेंबर रोजी चेन्नई आणि मदुराई येथील पाच ठिकाणी छापेमारी केली आहे. आता काळा पैशाच्या कायद्यानुसार 2015 अंतर्गत कारवाई करण्यात येईल. गुंतवणुकीचे सध्याचे मूल्य 354 कोटी रुपयांहून जास्त आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Income tax, Money, Tax fraud

    पुढील बातम्या