कंगनाची टिवटिव सुरू; थेट अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांवरच साधला निशाणा; म्हणाली हे तर 'गजनी'

कंगनाची टिवटिव सुरू; थेट अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांवरच साधला निशाणा; म्हणाली हे तर 'गजनी'

कंगनीने पुन्हा आपली टिवटिव सुरू केली आहे..यावेळी ती कमला हॅरिस यांच्याबद्दल म्हणाली की..

  • Share this:

मुंबई, 8 नोव्हेंबर : अमेरिका निवडणुकीच्या निकालानंतर संपूर्ण जगात एकच चर्चा सुरू आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील यावर आपली प्रतिक्रिया जेत आहेत. प्रत्येक मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त करणारी कंगना रनौतही मोकळेपणाने यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. तिने अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आर बायडेन आणि निर्वाचित उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या विजयावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

जेथे एकीकडे कंगनाने बायडेन यांच्या विजयावर टीका केली आहे, तर दुसरीकडे कंगना कमला हॅरिस यांच्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे. ती लिहिते- गजनी बायडेन यांच्याबद्दल मी शुअर नाही..ज्यांचा डेटा प्रत्येक 5 मिनिटाला क्रॅश होता. इतक्या औषधांचे इंजेक्शन त्यांच्यामध्ये इंजेक्ट करण्यात आले आहे, की ते 1 वर्षाहून जास्त काळ टिकू शकणार नाही. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, कमला हॅरिसच शो पुढे चालवतील. जेव्हा एक महिला उठते तेव्हा ती दुसऱ्या महिलेसाठी रस्ता तयार करते. या ऐतिहासिक दिवसासाठी चिअर्स!

हे ही वाचा-इथं जो बायडन झाले राष्ट्राध्यक्ष, तिकडे ट्रम्प पाहा काय करत होते; VIDEO VIRAL

येथे बायडेन यांना गजनी आणि त्यांचा डेटा क्रॅश होणे या वक्तव्याचा संबंध त्यांच्या स्मरणशक्तीशी आहे. चित्रपट गजनीमध्ये आमिर खान यांच्याप्रमाणे दुसऱ्या क्षणाला बायडेन सर्व विसरुन जातात, असं कंगनाला सांगायचं आहे. आता कंगनाने बायडेन यांच्यावर केलेल्या टीकेवरुन तर एक गोष्ट स्पष्ट आहे की, तिला बायडेन यांच्या विजयाचा आनंद झालेला नाही. याला तिने महिलेचा विजय असल्याचे सांगितले. 56 वर्षीय कॅलिफोर्नियाची सिनेटर कमला हॅरिस तीन आशियाई अमेरिकन सिनेटरांपैकी एक आहे. त्या या चेंबरमध्ये येणारी पहिली भारतीय-अमेरिकन सिनेटर आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: November 8, 2020, 3:12 PM IST

ताज्या बातम्या