नेपाळ, 9 ऑगस्ट : नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रत्युत्तर दिलं आहे. ज्यामध्ये त्यांनी भगवान बुद्ध यांना भारतीय म्हटलं आहे. रविवारी जारी केलेल्या वक्तव्यात नेपाळ परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, हे एक ऐतिहासिक आणि पुरातत्वाच्या पुराव्यातून सिद्ध झालेलं सत्य आहे की गौतम बुद्ध यांचा जन्म नेपाळमधील लुंबिनीमध्ये झाला होता. जयशंकर यांनी शनिवारी एका वर्च्युअल कार्यक्रमात भगवान बुद्ध भारतीय असल्याचा दावा केला होता.
प्रत्युत्तरात म्हटले आहे की, ही ऐतिहासिक आणि पुरातत्वांच्या पुराव्यातून सिद्ध झालेलं सत्य आहे की गौतम बुद्ध यांचा जन्म नेपाळमधील लुबिंनीमध्ये झाला होता. भगवान बुद्धांचां जन्मस्थळ आणि बौद्ध धर्माची उत्पत्ती स्थळ लुंबिनी युनेस्कोच्या जागतिक वारसांपैकी एक आहे.
मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2014 मध्ये नेपाळ यात्रेचा उल्लेख केला, यावेळी मोदींनी म्हटलं होतं की नेपाळ हा असा देश आहे जेथे विश्व शांतीचे प्रतीक भगवान बुद्धांचा जन्म झाला होता. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की बौद्ध धर्माचा वेळेनुसार नेपाळपासून जगातील अन्य भागात प्रसार झाला हेच सत्य आहे. याशिवाय प्रत्युत्तर असंही म्हटलं आहे की या मुद्द्यावर वाद होऊ शकत नाही. संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाला याबाबत माहिती आहे.
यापूर्वी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पुन्हा एकदा भगवान राम जन्मभूमी ही नेपाळमधील चितवन जिल्ह्यात असल्याचा दावा केला आहे. या जिल्ह्यात माडी नगरपालिका क्षेत्र आहे. ज्याचं नाव अयोध्यापुरी आहे. शनिवारी ओली यांनी या भागातील अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली. त्यांना राम, लक्ष्मण आणि सीता यांची प्रतिमा लावण्याचे आदेश दिले. ओली यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की अयोध्यापुरीलाच खऱ्या अयोध्याच्या (Ayodhya) स्वरुपात प्रोजेक्ट आणि प्रमोट करावे.