लग्नाला आले होते 55 पाहुणे... पण न आलेल्या 177 जणांना झाला कोरोना, 7 दगावले

लग्नाला आले होते 55 पाहुणे... पण न आलेल्या 177 जणांना झाला कोरोना, 7 दगावले

जगाच्या पाठीवर कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट आल्याचं बोललं जात आहे.

  • Share this:

मेन (अमेरिका): जगाच्या पाठीवर कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट आल्याचं बोललं जात आहे. तरी देखील बहुताश नागरिक कोरोनाबाबत गंभीर नसल्याचं समोर येत आहे. मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग बंधनकारक आहे. तरी देखील अनेकांनी सर्व नियम थाब्यावर बसवले आहेत. असाच एक प्रकार अमेरिकेत घडला आहे. एका लग्नात 55 पाहुणे सहभागी असताना एकूण 177 जणांना कोरोनाची लागण झाला तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेतील मेन  (America Main) नावाच्या राज्यात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमेरिकेतील आरोग्य संघटना सेंटर फॉर डिसिस कंट्रोल (CDC) सध्या या संपूर्ण घटनेचा अभ्यास करत आहे.

हेही वाचा..महाराष्ट्रासाठी दिलासादायक आकेडवारी! 'या' बाबतीत राज्य ठरले देशात नंबर वन

मिळालेली माहिती अशी की, अमेरिकेतील मेन राज्यात 7 ऑगस्टला एक विवाह सोहळा पार पडला. विवाह सोहळ्याला 55 पाहुणे उपस्थित होते. मात्र, सोहळ्याच्या दुसऱ्याच दिवशी लग्नाला आलेल्या एका व्य्क्तीला कोरोनाची लागण झाली. त्याच्याच कोरोनाची लक्षणं आढळून आली. त्यानंतर लग्नाला आलेल्या सर्वच्या सर्व 55 पाहुण्यांची कोरोना चाचणी घेतण्यात आली. त्यात 27 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दरम्यान, लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी नाक आणि तोंडावर मास्क लावलेला नव्हता. तसेच सोशल डिस्टंसिंगचे नियम देखील पाळलेले नव्हते, हे समोर आलं आहे.

धक्कादायक माहिती अशी की, लग्नाला उपस्थित राहिलेला एक जण दुसऱ्या दिवशी त्याच्या वडिलांना भेटला होता. त्याचे वडील आरोग्य कर्मचारी होते. त्यांच्या माध्यमातून रुग्णालायाती 38 कर्मचारी आणि काही अन्य जण कोरोनाबाधित झाले. विशेष म्हणजे ही व्यक्ती विवाह स्थळापासून सुमारे 160 किलोमीटर अंतरावर राहते. यातील एकही व्यक्ती विवाह सोहळ्याला उपस्थित नव्हती. तरी देखील एका व्यक्तीच्या माध्यमातून कोरोना त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्या पैकी 7 जणांना आपला जीव गमवावा लागला.

हेही वाचा...बापरे! 5 वर्षांच्या चिमुकल्याच्या पोटातून काढली 3 फूट लांब गाठ; डॉक्टरही हैराण

दरम्यान, त्याच विवाह सोहळ्याला आणखी एक पाहुणा तब्बल 320 किलोमीटर अंतरावरून आला होता. या व्यक्तीच्या शरीरात आठवड्यानंतर कोरोनाची लक्षण आढळून आले. हा व्यक्ती तुरुंगात नोकरीला होता. त्याच्यमुळे तुरुंगातील 18 कर्मचारी तर 48 कैद्यांना कोरोनाची लागण झाली. तर संबंधीत कुटुंबातील 16 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.

धक्कादायक म्हणजे, विवाह समारंभाला उपस्थित पाहुण्यांची यादी यजमानांनी तयारच केली नव्हती, तसेच याबाबत आरोग्य यंत्रणेलाही माहिती देण्यात आली नसल्याचं सीडीसीच्या अहवालात म्हटलं आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: November 21, 2020, 5:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading