• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • विद्यार्थिनींच्या कपड्यांवरुन मुख्याध्यापकाचं घृणास्पद वक्तव्य; शिक्षक दिनी FIR दाखल

विद्यार्थिनींच्या कपड्यांवरुन मुख्याध्यापकाचं घृणास्पद वक्तव्य; शिक्षक दिनी FIR दाखल

ग्रामीण भागात 5 ते 8 वी आणि शहरी भागात 8 ते 12 वी शाळा सुरू केल्या जाणार आहे.

ग्रामीण भागात 5 ते 8 वी आणि शहरी भागात 8 ते 12 वी शाळा सुरू केल्या जाणार आहे.

या मुख्याध्यापकांनी विद्यार्थिनींविरोधात चुकीचं वक्तव्य केल्याची माहिती समोर आली आहे.,

 • Share this:
  भोपाल, 5 सप्टेंबर : आज शिक्षक दिनानिमित्त (Teachers Day) प्रत्येकजण आपल्या शिक्षकांचे आशीर्वाद घेत आहे. त्याच्या आयुष्यातील योगदानाबद्दल धन्यवाद देत आहेत. परंतु मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील मचलपूरच्या शासकीय उच्च माध्यमिक शाळेत  (Higher Secondary School) काही मुलींनी त्यांच्याच शिक्षकाविरोधात एफआयआर (FIR) दाखल केला आहे. शिक्षक दिनी काही मुली रंगीत कपड्यांमध्ये (Civil Dress) शाळेत पोहोचल्या होत्या. ज्यामुळे मुख्याध्यापक (Principal) राधेश्याम मालवीय संतापले. या दरम्यान मुख्याध्यापक असं काही म्हणाले जे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. सिव्हील ड्रेसमध्ये शाळेत आल्यामुळे प्राचार्य म्हणाले की, उद्यापासून कपड्यांशिवाय शाळेत या, मुलांना तुम्ही बिघडवत आहात. असं म्हटल्यामुळे विद्यार्थिनीना धक्का बसला. त्यांनी शिक्षकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली. हे ही वाचा-हिऱ्यांची अंगठी नाही तर लग्नही नाही; नवरीला मारहाण करीत नवरदेव फरार मुख्याध्यापकांच्या या विधानामुळे विद्यार्थिनी संतप्त झाल्या. निषेध म्हणून, त्यांनी शाळेतील इतर विद्यार्थ्यांना एकत्र केले. सर्वांनी शाळेपासून पोलीस स्टेशनपर्यंत रॅली काढून मुख्याध्यापकाविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी स्टेशन प्रभारी जितेंद्र अजनारे यांनी सांगितलं की, आरोपी मुख्याध्यापक राधेश्याम मालवीय यांच्याविरोधात पॉक्सो कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या मुख्याध्यापक फरार आहे, त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: