मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /विश्व हिंदू सेनेची घोषणा; ' हाथरस केसमधील चारही आरोपींचे गुप्तांग कापून आणा, मी 25 लाख रोख देईन'

विश्व हिंदू सेनेची घोषणा; ' हाथरस केसमधील चारही आरोपींचे गुप्तांग कापून आणा, मी 25 लाख रोख देईन'

एक व्हिडीओ शेअर करीत उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे.

एक व्हिडीओ शेअर करीत उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे.

एक व्हिडीओ शेअर करीत उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे.

लखनऊ, 30 सप्टेंबर : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी मध्यरात्री पीडिताचे अंत्यसंस्कार केल्यानंतर लोकांनी आक्रोश व्यक्त केला आहे. या प्रकरणात राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या प्रकरणात आता विश्व हिंदू सेनेचे संरक्षक यांनी हाथरसच्या चारही आरोपींचे गुप्तांग कापणाऱ्याला 25 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी याचा एक व्हिडीओ शेअर करीत उत्तर प्रदेश सरकारवर  निशाणा साधला आहे.

विश्व हिंदू सेनेचे अध्यक्ष अरुण पाठक यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणतात की, देशात मोदी आणि उत्तर प्रदेशात जेव्हा योगी सरकार आलं तेव्हा वाटलं की धर्माचं शासन आलं आहे. मात्र या सरकारमध्ये ब्राम्हण आणि दलितांमधील भाजपचा सदस्य न होणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी असं कधीचं नव्हतं.

हे ही वाचा-बाबरी मशीद प्रकरणात कोर्टाच्या निर्णयावर पाकिस्तान सरकारची जहरी टीका, म्हणाले

मुलींच्या कुटुंबीयांवर पोलिसांचा मानसिक बलात्कार

अरुण पाठक यावेळी म्हणाले की, हाथरसमध्ये जे काही झालं...नराधमांनी मुलीवर बलात्कार केले, आणि आता पीडितेच्या कुटुंबीयांवर पोलीस मानसिक बलात्कार करीत आहेत. उत्तर प्रदेशातील पोलीस जे काही करीत आहे, ते माफ करण्यालायक नाही. योगीच्या पोलिसांनी पीडितेच्या आई-वडिलांचीही वाट पाहिली नाही. मध्यरात्री तिच्यावर अंत्यसंस्कार केले. पीडितेच्या आई-वडिलांना शेवटी मुलीचा चेहराही पाहायला मिळाला नाही. विश्व हिंदू सेनेचे संरक्षक यांनी सांगितलं की, हाथरसमधील चारही आरोपींचे गुप्तांग कापणाऱ्याला 25 लाख रुपये देण्यात येतील अशी घोषणा आम्ही केली आहे.

जेथे धाडस दाखवायला हवं होत..

अरुण पाठक यांनी म्हटलं आहे की, योगींच्या पोलिसांना जेथे धाडस दाखवायला हवं होते तेथे दाखवलं नाही. जनतेला विनंती आहे की, आता वेळ आली आहे. आता सीमा पार केली आहे, पुन्हा एकदा क्रांती होईल.

First published:

Tags: Nirbhaya gang rape case, Yogi