केएल राहुलसोबतच्या 'रिलेशनशिप'वर 'हे' आहे आथिया शेट्टीचं उत्तर!

केएल राहुलसोबतच्या 'रिलेशनशिप'वर 'हे' आहे आथिया शेट्टीचं उत्तर!

राहुलने शेअर केलेल्या फोटोत दोघांची असलेली जवळीक स्पष्ट दिसतेय. ते दोघही प्रेमात पडलेले फोटोतून दिसतंय.

  • Share this:

मुंबई 10 नोव्हेंबर : क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) आणि सुनील शेट्टी ची मुलगी आथिया शेट्टी (Athiya Shetty) यांच्यातल्या गट्टीच्या बातम्या कायम येत असतात. अथियाच्या वाढदिवसाच्या दिवशीही राहुलने एक रोमँटीक फोटो शेअर केला होता. त्यामुळे दोघांच्या 'रिलेशनशिप'ची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीय. या फोटोमुळेत दोघांच्याही फॅन्सनी मात्र सोशल मीडियावर चांगल्याच कमेंट्स केल्या आहेत. राहुलने शेअर केलेला फोटो व्हायरलही झाला असून त्यावर दोघांनाही नेटकऱ्यांनी प्रश्नही विचारले आहेत. या फोटोत दोघांची असलेली जवळीक स्पष्ट दिसतेय. ते दोघही प्रेमात पडलेले फोटोतून दिसत असलं तरी त्यावर दोघांनीही स्पष्टपणे काहीही सांगितलेलं नाहीये. दोघांच्या अफेअरच्या बातम्यांमुळे तुझ्यावर काही परिणाम होतो का असा जेव्हा प्रश्न तिला विचारण्यात आला तेव्हा तिने त्याचं उत्तरही तेवढच थेटपणे दिलं.

Bigg Boss 13 : नाव घेतल्याने सलमान खानवर भडकली राखी सावंत, म्हणाली...

तिने सांगितलं की मी माझं खासगी आयुष्य कधीही सार्वजनिक करत नाही. मला खासगीपण जपायला आवडतं. त्यामुळे त्याबद्दल माध्यमांना काहीही सांगण्याची गरज नाही. त्यामुळे आजही मी काहीच सांगणार नाही.

पण अनेक कार्यक्रमांमध्ये आणि पार्ट्यांमध्ये दोघांची उपस्थिती अनेकदा दिसून आलीय. दोघेही अनेकदा एकाच गाडीतून येताना आढळल्याने त्यांच्यात  चांगलीच गट्टी जमली आहे असं म्हटलं जातं. वडिल सुनील शेट्टी यांच्यासोबतही  चित्रपटात काम करायला आवडेल असंही तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

'ठाकरे' चित्रपटाचा येणार सिक्वल, बाळासाहेबांचं वादळ पुन्हा झळकणार पडद्यावर

2015 मध्ये तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर हीरो चित्रपटात पहिल्यांदा काम केलं. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी झाला होता. त्यानंतर ती मुबारक चित्रपटातही दिसली होती.

First published: November 10, 2019, 7:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading