मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /अधिकाऱ्यांचं गाव! अवघ्या 75 घरांच्या या गावातील प्रत्येक घरात आहे एक IAS किंवा IPS अधिकारी; वाचून वाटेल आश्चर्य

अधिकाऱ्यांचं गाव! अवघ्या 75 घरांच्या या गावातील प्रत्येक घरात आहे एक IAS किंवा IPS अधिकारी; वाचून वाटेल आश्चर्य

हे गाव आता त्याच्या नावापेक्षाही जास्त ‘अधिकाऱ्यांचं गाव’ म्हणून प्रसिद्ध झालं आहे.

हे गाव आता त्याच्या नावापेक्षाही जास्त ‘अधिकाऱ्यांचं गाव’ म्हणून प्रसिद्ध झालं आहे.

हे गाव आता त्याच्या नावापेक्षाही जास्त ‘अधिकाऱ्यांचं गाव’ म्हणून प्रसिद्ध झालं आहे.

    जौनपूर, 29 सप्टेंबर:आपल्याकडे उत्तर भारतातला एखादा IAS किंवा IPS अधिकारी आहे असं म्हटलं, की तो बिहारचाच असावा असं समजलं जातं; मात्र उत्तर प्रदेशात एक असं गाव आहे, जिथे प्रत्येक घरामध्ये एक IAS/IPS अधिकारी आहे. माधोपट्टी (Madhopatti village story) असं नाव असणारं हे गाव राज्याच्या जौनपूर (Jaunpur village of IAS officers) जिल्ह्यात आहे. हे गाव आता त्याच्या नावापेक्षाही जास्त ‘अधिकाऱ्यांचं गाव’ म्हणून प्रसिद्ध झालं आहे.

    माधोपट्टी हे तसं छोटंसंच गाव आहे. गावात अवघी 75 कुटुंबं राहतात. विशेष म्हणजे इथं घरटी एक आयएएस किंवा आयपीएस अधिकारी तयार होतो. या गावात जन्म घेतला, की मुलगा असो वा मुलगी, पुढे जाऊन अधिकारी (Village of IAS and IPS officers) होणार हे नक्कीच, असंही तिथले नागरिक मिश्किलपणे म्हणतात. उत्तर प्रदेशसोबत आजूबाजूच्या इतर राज्यांना या गावाने आतापर्यंत तब्बल 47 आयएएस अधिकारी दिले आहेत. दी लखनौ ट्रिब्युनने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    हे वाचा - What an idea! एका फटक्यात UPSC Cleared; अजब ट्रिक सोशल मीडियावर Viral

    या सगळ्याची सुरुवात झाली 1914 साली. या गावातल्या मुस्तफा हुसैन (Mustafa Hussain Jaunpur) यांची निवड आयएएस अधिकारी म्हणून झाली होती. पीसीएमध्ये निवड झाल्यानंतर त्यांनी ब्रिटिश सरकारसाठी काम केलं. याच काळात इंदुप्रकाश सिंह (Indu Prakash Singh village) नावाच्या एका व्यक्तीचीही आयएएस म्हणून निवड झाली होती. त्यांनी पुढे फ्रान्ससह अन्य अनेक देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम पाहिलं.

    इंदुप्रकाश सिंह यांचा संपूर्ण देशात तेरावा क्रमांक आला होता. त्यांच्यानंतर या गावातून आयएएस अधिकारी निवडले जाण्याचा सपाटाच लागला. त्यांचेच चार नातेवाईकही पुढे आयएएस अधिकारी झाले. या गावातल्या विनय सिंह यांनी बिहारचे माजी सचिव म्हणून कामकाज पाहिलं आहे. त्यांनी 1955मध्ये या परीक्षेत क्रमांक मिळवला होता. त्यानंतर 1965मध्ये त्यांच्या दोन भावांनीही या परीक्षेत यश मिळवलं.

    तुम्हाला वाटत असेल, की या गावातले (UP Village of officers) केवळ पुरुषच आयएएस होत आहेत, तर थोडं थांबा. या गावातल्याच उषा सिंह यादेखील आयएएस ऑफिसर झाल्या होत्या. यासोबतच, 1983मध्ये आयएएस झालेले चंद्रमौल सिंह यांच्या पत्नी इंदू सिंहदेखील त्याच वर्षी आयपीएस ऑफिसर झाल्या होत्या. केवळ अधिकारीच नाही, तर इतर क्षेत्रांतही या गावातले तरुण मागे नाहीत. गावातल्या अवघ्या 22 वर्षांच्या अमित पांडे यांची कित्येक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. अनमजय सिंह हे मनिलामध्ये वर्ल्ड बँकेत कार्यरत आहेत. तसंच, गावातले ज्ञानू मिश्रा हेदेखील भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोमध्ये काम करत आहेत.

    हे वाचा - भयंकर! बॉयफ्रेड सोडून गेल्यामुळे गर्लफ्रेंड चिडली; दगडाने ठेचून केली हत्या

    डॉ. सजल सिंह सांगतात, की मुस्तफा हुसैन यांच्यामुळे पेटलेल्या ठिणगीची आता मशाल झाली आहे. या गावातला प्रत्येक तरुण-तरुणी आता अधिकारी व्हायचं स्वप्न पाहतात. आपल्या गावाचा साक्षरता दर इतर गावांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. तसंच, गावात जवळपास सर्व नागरिक पदवीधर आहेत, असं सजल सिंह अभिमानाने सांगतात!

    First published:
    top videos

      Tags: Uttar pardesh