मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /VIDEO : रानगव्यांसोबत कोल्हापूर जिल्ह्यात हत्तीचंही दर्शन; शेतकरी धास्तावला

VIDEO : रानगव्यांसोबत कोल्हापूर जिल्ह्यात हत्तीचंही दर्शन; शेतकरी धास्तावला

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालूक्यात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर होत असून त्यांच्याकडून शेतपिकाचे नुकसान होत असल्याची तक्रार गावकऱ्यांकडून केली जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालूक्यात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर होत असून त्यांच्याकडून शेतपिकाचे नुकसान होत असल्याची तक्रार गावकऱ्यांकडून केली जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालूक्यात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर होत असून त्यांच्याकडून शेतपिकाचे नुकसान होत असल्याची तक्रार गावकऱ्यांकडून केली जात आहे.

आजरा, 3 जानेवारी : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालूक्यात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर होत असून त्यांच्याकडून शेतपिकाचे नुकसान होत असल्याची तक्रार गावकऱ्यांकडून केली जात आहे. इतकच नाही तर जंगलातील हत्ती आणि गवे नागरी वस्तीत येत आहेत. यातून तर आता हत्ती दिवसा आणि रात्रीच्या सुमारास  नागरिकांना दर्शन देऊ लागले आहेत. यामुळे नागरिकामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील सुळेरान, घाटकरवाडी, मसोली, गवरे सह आता जेउर चितळे या भागामध्ये हत्तीचे आगमन झाले आहे. या हत्तीचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे.

याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा हत्ती कुणा जंगलातील नाही तर कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालूक्यातील चेऊरला जाणार्‍या रस्त्यावरील आहे.  या भागात आता हत्ती दिसणे नित्यांची बाब झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

आजरा तालुक्यात एक-दोन नव्हे तर तब्बल आठ रानगव्यांचा कळप मानवी वस्त्यांमध्ये फिरताना दिसतो आहे. गेल्या दोन आठवड्यांमध्ये तब्बल चार वेळा या आठ रानगव्यांच्या कळपाने मानवी वस्तीत हजेरी लावली. आजरा आणि परिसरातील तालुक्यांमध्ये असलेल्या जंगलांमध्ये अनेक वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. अनेकदा हे प्राणी शेतांच्या भागात फिरतात आणि पिकांचे अतोनात नुकसान करतात. या रानगव्यांच्या कळपाकडूनही ऊसासह अनेक पिकांचे मोठे नुकसान करण्यात आले आहे. तब्बल आठ गव्यांचा कळप फिरतानाचा व्हिडीओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला आहे. रस्त्यावर फिरणारे हे रानगवे पाहिल्यानंतर कुणाच्याही मनात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. आजरा तालुक्यातील फिरणाऱ्या या कळपाचा व्हिडीओ आहे.  ( Kolhapur district there is a panic of wild cows)

First published:
top videos

    Tags: Kolhapur