मराठी अभिनेते वैभव मांगले नाटकाच्या शोदरम्यान चक्कर येऊन स्टेजवरच कोसळले

मराठी अभिनेते वैभव मांगले नाटकाच्या शोदरम्यान चक्कर येऊन स्टेजवर कोसळले. सांगलीच्या भावे नाट्यगृहात मांगले त्यांच्या नाटकाचा शो सुरू होता.

News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2019 08:31 PM IST

मराठी अभिनेते वैभव मांगले नाटकाच्या शोदरम्यान चक्कर येऊन स्टेजवरच कोसळले

सांगली, 26 एप्रिल- मराठी अभिनेते वैभव मांगले नाटकाच्या शोदरम्यान चक्कर येऊन स्टेजवर कोसळले. सांगलीच्या भावे नाट्यगृहात मांगले त्यांच्या नाटकाचा शो सुरू होता. त्यांना उपचारासाठी तातडीने खासगी रूग्णालयात हलवण्यात आले आहे.

'अलबत्या गलबत्या' या नाटकाचा प्रयोग सुरू असतानाच वैभव मांगले हे स्टेजच्या बाजूला कोसळले. यामुळे एकच खळबळ उडाली.  यावेळी मांगले यांना तातडीने संयोजकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे भावे नाट्य गृहातील 'अलबत्या गलबत्या' नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला आहे. या नाटकात मांगले यांची मुख्य भूमिका आहे. मांगले यांची तपासणी केली असता अशक्तपणामुळे त्यांना चक्कर आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे संयोजकांनी सांगितले आहे.


VIDEO: भिवंडीत उमेदवाराच्या कार चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 08:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...