अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची पुन्हा कारागृहात रवानगी, कोरोनामुळे एम्समध्ये सुरू होते उपचार

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची पुन्हा कारागृहात रवानगी, कोरोनामुळे एम्समध्ये सुरू होते उपचार

61 वर्षीय छोटा राजन याला 2015मध्ये अटक करण्यात आली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 मे: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन (Chhota Rajan) याने कोरोनावर (Corona) मात केली आहे. कोरोनामुक्त झाल्याने छोटा राजन याला दिल्लीतील एम्स रुग्णालयातून (AIIMS, Delhi) डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुक्त झालेल्या छोटा राजन याला एम्स रुग्णालयातून पुन्हा एकदा तिहाडर कारागृहात पाठवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी छोटा राजन याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं सुद्धा वृत्त समोर आलं होतं. मात्र, रुग्णालय प्रशासनाने हे वृत्त फेटाळलं होतं. त्यानंतर आता त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला जेल क्रमांक 2 मध्ये ठेवण्यात आले आहे. त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याने उपचारासाठी 22 एप्रिल रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन कोरोना पॉझिटिव्ह, उपचारासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल

छोटा राजन याला 2015 साली अटक करण्यात आली होती. इंडोनेशिया येथून प्रत्यार्पण करण्यात आल्यावर त्याची रवानगी दिल्लीतील तिहार कारागृहात करण्यात आली होती. छोटा राजन याच्यावर खून, खंडणीसारखे सुमारे 70 गुन्हे दाखल आहेत. या सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. 2011साली मुंबईत पत्रकार डे यांची हत्या झाली होती त्या प्रकरणातही छोटा राजनचा हात होता.

छोटा राजन याला 22 एप्रिल रोजी कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर उपचारासाठी त्याला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून तिहार कारागृहातील उच्च सुरक्षा कक्षात त्याला ठेवण्यात आले आहे.

Published by: Sunil Desale
First published: May 11, 2021, 9:23 PM IST

ताज्या बातम्या