टिटवाळा, 29 नोव्हेंबर : टिटवाळानजीक असलेल्या रायता परिसरात दिशा व्यसनमुक्ती केंद्र आहे. या केंद्रात व्यसनाधीन झालेल्या तरुण तरुणींना व्यसनातून मुक्त केले जाते. त्यानंतर त्यांचे पुनर्वसन केले जाते. या केंद्रात एक धक्कादायक घटना घडली आहे. या केंद्रात किशोरी सावंत, ईशा पांडे, विशाखा कोटावे या तरुणी राहत होत्या. या तिघींही चांगल्या घरातील तरुणी आहे. त्या व्यसनाधीन झाल्याने त्यांना या केंद्रात ठेवण्यात आले होते. ईशा आणि विशाखा काही दिवसांपासून हैराण झाल्या होत्या. त्याना केंद्राचा कंटाळा आला होता. त्यामुळे केंद्रातून सुटका करुन घेण्यासाठी त्यांनी खास मैत्रिणीचा जीव घेतला आहे. केंद्रातून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी या दोघींनी त्यांच्यासोबत राहणाऱ्या किशोरी सावंत या तरुणीला ठार मारण्याचा कट रचला. किशोरीला डोक्यातील उवा मारण्याचे औषध जेवणात टाकले. तिला त्याचा काही एक फरक फडला नाही. त्यानंतर या दोघींनी किशोरीचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केली. त्यातूनही किशोरी वाचली. त्यामुळे दोघींनी झोपण्याच्या उशीने तिचे तोंड दाबले. यात किशोरीचा मृत्यू झाला. इतर बातम्या - येडा का खुळा! दंड घेतल्यामुळे रागात फोडली बाईक, नंतर ढसाढसा रडला; VIDEO व्हायरल या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर किशोरीच्या अशा प्रकारे जाण्यामुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी दोघींना अटक करुन पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, सीनिअर पीआय बालाजी पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण व्यसनमुक्ती केंद्रात याबद्दल चौकशी करण्यात येणार आहे. इतर बातम्या - पत्नीचा बॉयफ्रेंड परतला म्हणून पतीचा मोठा निर्णय, रिअल लाईफ ‘हम दिल दे चुके सनम’ या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपी तरुणींना ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस आता पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून किशोरीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर आता प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे. इतर बातम्या - हैदराबाद गँगरेपात तरुणीने आधी बहिणीला फोन का केला? गृहमंत्र्यांचं धक्कादायक विधान
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







