मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /नागपूर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात; दोन दुचाकींच्या धडकेत एक ठार तर दोघेजण गंभीर

नागपूर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात; दोन दुचाकींच्या धडकेत एक ठार तर दोघेजण गंभीर

पघातातील गंभीर जखमींना उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले आहे.

पघातातील गंभीर जखमींना उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले आहे.

पघातातील गंभीर जखमींना उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले आहे.

वाशिम, 8 फेब्रुवारी/ किशोर गोमाशे : दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एक जण ठार तर दोन जणं गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी नागपूर-औरंगाबाद या महामार्गावरील अमरावती-कारंजा दरम्यान माटोडा फाट्यानजीक घडली.

कारंजाहून अमरावतीकडे एम एच 37 यु 8933 क्रमांकाच्या दुचाकीने दोघेजण जात असतांना विरूध्द दिशेने येणाऱ्या एम एच 27 बी आर 1607 क्रमांकाच्या दुचाकीला  जोरदार धडक बसली.

हे ही वाचा-गोहत्या बंदी विधेयकामुळे मोठा गदारोळ;काँग्रेस नेत्याने परिषदेत बिलाची प्रत फाडली

या भीषण अपघातात अमरावती येथील मुक्तार अहमद शेख ( वय 31 वर्षे ) हा ठार झाला असून इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील गंभीर जखमींना उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले आहे. दरम्यान जखमी व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम धनज पोलीस करीत आहेत.

दरम्यान आज मुंबईजवळील (Mumbai) मीरा रोड  परिसरात (Mira road) एका मोकळ्या मैदानात गॅस सिलेंडरने (Gas cylinder) भरलेल्या ट्रकला भीषण आग लागली होती. आग लागल्यानंतर एकापाठोपाठ 7 सिलेंडरचा भीषण स्फोट (Gas cylinder blast) झाला. या आगीत ट्रॅकचा जळून कोळसा झाला आहे. या सिलेंडर स्फोटाचे व्हिडीओ समोर आली आहे. मीरा रोड भागातील मोकळ्या परिसरात गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा ट्रक उभा होता. पहाटे 2 वाजेच्या सुमारास अचानक या ट्रकला आग लागली. ट्रकला आग लागल्याची माहिती मिळताच मीरा भाईंदर अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

First published:

Tags: Road accident