मुंबई : पेट्रोल-डिझेल च्या दरात बऱ्याच दिवसांपासून दिलासा मिळत असला तरी दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी अनेक शहरांमध्ये इंधनाचे दर वाढले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये चढ उतार पाहायला मिळत आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आजचे ताजे पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी उत्तर प्रदेशातील काही शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्याचबरोबर बिहारमध्येही भाव स्थिर राहिले आहेत. गाझियाबादमध्ये पेट्रोल 35 पैशांनी वाढून 96.58 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. तर डिझेलच्या दरात 33 पैशांनी वाढ झाली आहे. डिझेल 89.75 रुपये प्रति लिटर झालं आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर दिल्लीत पेट्रोलचे भाव 101.84 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.07 रुपये आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे. कोलकाता इथे पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. हे वाचा-Diwali 2022 : कार-बाईक घेण्याआधी 5 गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल नुकसान पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर तुम्हाला SMS द्वारेही मिळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 क्रमांकावर आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्यासोबतच HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत शोधू शकतात. रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर बदलतात.
पेट्रोल-डिझेल एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन, वॅट यासोबत अन्य काही टॅक्सचा समावेश केल्यानंतरचे दर तुम्हाला दिसतात. त्यामुळे पेट्रोल डिझेलची किंमत वाढते. ऐन सणासुदीच्या काळात पेट्रोल-डिझेल महाग झाल्याने चिंता वाढली आहे.