दिवाळीत विमानानं प्रवास करताय? ‘ही’ 5 क्रेडिट कार्ड ठेवा सोबत, एअरपोर्ट लाउंजमध्ये मिळेल मोफत प्रवेश
ही सुविधा सध्या बाजारात असलेल्या अनेक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर उपलब्ध आहे. सध्या, आम्ही 5 क्रेडिट कार्ड्सचा उल्लेख करत आहोत ज्याद्वारे तुम्ही लाउंज प्रवेशाची सुविधा मिळवू शकता.
तुम्ही विमानतळावर असलेल्या लाउंजला भेट देऊन तुमचा वेळ घालवू शकता. येथे तुम्ही वर्तमानपत्रे आणि मासिके वाचू शकता. केटरिंग व्यतिरिक्त तुम्ही वायफाय वापरू शकता. तुम्हाला माहित आहे का की तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डद्वारे मोफत लाउंज प्रवेशाचा लाभ घेऊ शकता?
2/ 6
कॅशबॅक एसबीआय कार्ड 999 रुपयांच्या नूतनीकरण शुल्कासह येते आणि तुम्हाला भारतात दरवर्षी 4 वेळा एअरपोर्ट लाउंजमध्ये (एक तिमाहीत एकदा) मोफत प्रवेश देते (फोटो क्रेडिट- sbicard.com)
3/ 6
Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड ग्राहकांना वर्षभरात 4 वेळा मोफत डोमेस्टिक एअरपोर्ट लाउंजमध्ये प्रवेश मिळतो. या कार्डचे वार्षिक शुल्क 500 रुपये आहे.
4/ 6
Axis Bank Ace क्रेडिट कार्ड 999 रुपये वार्षिक शुल्कासह येते. कार्डधारकाला दरवर्षी 4 वेळा मोफत डोमेस्टिक एअरपोर्ट लाउंजमध्ये प्रवेश मिळतो. (फोटो क्रेडिट- axisbank.com)
5/ 6
HDFC बँक मिलेनिया क्रेडिट कार्ड 1000 रुपयांच्या नूतनीकरण शुल्कासह येते. या कार्डद्वारे, तुम्ही वर्षातून 8 वेळा देशांतर्गत विमानतळ लाउंजमध्ये प्रवेश करू शकता. एका तिमाहीत जास्तीत जास्त 2 वेळा देशांतर्गत विमानतळ लाउंजमध्ये प्रवेश करू शकतो.
6/ 6
ICICI Coral RuPay क्रेडिट कार्ड वार्षिक 500 रुपये शुल्कासह येते. कार्डधारक एका तिमाहीत एकदा देशांतर्गत विमानतळ लाउंजमध्ये प्रवेश करू शकतात. (फोटो क्रेडिट- Twitter/ICICIBank)