आजही पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर, 'हे' आहेत तुमच्या शहरातले दर

आजही पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर, 'हे' आहेत तुमच्या शहरातले दर

Petrol, Diesel - जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे दर

  • Share this:

मुंबई, 03 सप्टेंबर : सप्टेंबर महिन्याचा आजचा तिसरा दिवस. पेट्रोल,डिझेल ग्राहकांसाठी खूशखबर आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आजही स्थिर आहेत. त्यात काही बदल झालेला नाही. कच्च्या तेलाच्या भावात चढउतार झाल्यानं घरगुती बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहिलेत.

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार सोमवारी दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि चेन्नई इथे पेट्रोलचे दर क्रमश: 72.01 रुपये, 77.67 रुपये, 74.67 रुपये आणि 74.80 रुपये प्रति लीटर आहेत. तर चार महानगरांमध्ये डिझेलचा दर क्रमश: 65.25 रुपये, 68.41 रुपये, 67.63 रुपये आणि 68.94 रुपये प्रति लीटर आहे.

नोकरदारांसाठी 'हे' आहेत गुंतवणुकीचे 4 उत्तम पर्याय

पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये प्रत्येक दिवशी वाढ तसंच घट पाहायला मिळते. सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी ( HPCL, BPCL, IOC ) रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर (excise duty), डीलर कमीशन या सर्व बाबी मिळून इंधनाच्या दरामध्ये वाढ होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात.

आधार अपडेट करायचंय? 'अशी' आहे सोपी पद्धत

आपल्या शहरातील इंधनाचे दर असे तपासा

विशेष नोंदणीकृत क्रमांकावर SMS पाठवून तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाच्या दरांबाबत माहिती मिळवता येईल. पण ही सुविधा आपल्या फोनवरून उपलब्ध व्हावी, यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी तुम्हाला कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. SMS सुविधा मिळवण्यासाठी कोड असणं आवश्यक आहे.

'या' मुस्लीम देशाच्या नोटेवर विराजमान आहेत गणराया

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा

इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड> 92249 9 2249

बीपीसीएल ग्राहक  RSP<डीलर कोड> 9223112222

एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड> 9222201122

या क्रमांकावर सुविधा पाठवून तुम्हाला इंधनाचे दर स्मार्टफोनवरच मिळवता येतील.

VIDEO: Ganesh Chaturthi 2019: दगडूशेठ गणपतीसमोर ऋषीपंचमीच्या निमित्तानं सामूहिक अथर्वशीर्ष पठण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: petrol
First Published: Sep 3, 2019 11:23 AM IST

ताज्या बातम्या