TikTok स्टार शिवानी मर्डर केस: आरोपीने कबुल केला गुन्हा, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

TikTok स्टार शिवानी मर्डर केस: आरोपीने कबुल केला गुन्हा, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

आरोपीने रागाच्या भरात तिचा गळा आवळून खून केला. यानंतर तिचा मृतदेह पलंगाच्या आत लपवून ठेवला आणि मोबाइल घेऊन फरार झाला.

  • Share this:

सोनीपत, 30 जून : टिकटॉक स्टार शिवानीच्या खूनाप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. आरोपी असलेल्या तिच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. दोघांची चार वर्ष मैत्री होती आणि शिवानीने अचानक बोलणं बंद केल्यामुळे तो नाराज झाला. म्हणून त्याने तिचा खून केल्याचा खुलासा पोलिसांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने याची कबुली दिली आहे.

घटनेच्या दिवशी तो तिला समजवण्यासाठी गेला होता. पण त्यांच्यात किरकोळ वाद झाला आणि शिवानीने बोलण्यास नकार दिला. यावर आरोपीने रागाच्या भरात तिचा गळा आवळून खून केला. यानंतर तिचा मृतदेह पलंगाच्या आत लपवून ठेवला आणि मोबाइल घेऊन फरार झाला. मंगळवारी पोलीस आरोपीला न्यायालयात हजर करतील. त्यासोबतच शिवानीचा मोबाइल शोधण्याचं काम सध्या सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.

TikTok, Helo तुम्हीही वापरत असाल तर बंदीनंतर सगळ्यात आधी करा हे काम

उत्तर प्रदेशचा असलेला विनोद त्याची मुलगी स्वेता आणि शिवानी हे 'टच अँड फेअर' या नावाने सलून चालवायचे. शुक्रवारी शिवानी सलूनमध्ये एकटी होती. त्याच वेळी तिची हत्या करण्यात आली. शिवानी टिकटॉवरही खूप अॅक्टिव्ह होती. तिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्याऊ मनियारी याला अटक केली आहे.

कोरोनाची 3 नवी लक्षणं आली समोर, त्रास जाणवला तर तात्काळ करा COVID-19 टेस्ट

'15 दिवस माझ्याशी बोलत नव्हती, म्हणून मारून टाकलं'

शिवानीने बोलणं बंद केल्यामुळे त्याने ही हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं. तो आधी तिच्या घराजवळ राहायचा. त्यावेळी दोघेही बर्‍याचदा बोलायचे. नंतर शिवानी दुसरीकडे राहायला गेली. शिवानीने गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्याशी बोलणं थांबवलं होतं. जे प्याऊला आवडलं नाही. त्यामुळे त्याने रागात येत शिवानीला कायमचं संपवलं.

संपादन - रेणुका धायबर

First published: June 30, 2020, 2:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading