चंद्रपूर, 22 जुलै : रस्ता ओलांडण्यासाठी थांबलेल्या वाघासाठी महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. वाघाला रस्ता ओलांडून दिल्यानंतर वाहतूक पुन्हा चालू करण्यात आली. नागभीड-ब्रह्मपुरी महामार्गावरील सायगाता येथे ही घटना घडली. वाघ रस्ता ओलांडून जातानाचा व्हिडिओ समोर आला (Chandrapur Tiger) आहे. काल (21 जुलै) दुपारी एक वाघ रस्त्याच्या कडेला बसला होता. मात्र, गजबजलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असल्याने वाघाला रस्ता ओलांडताना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे जंगलाचा राजा वाहनांच्या त्रासामुळे रस्त्याच्या कडेला थांबून होता. ही माहिती कोणीतरी वन विभागाला दिली. त्यानंतर वन पथक धावाधाव करत महामार्गावर आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोन्हीकडील वाहतूक थांबवून वाघाला जाण्याचा मार्ग मोकळा केला. दोन्ही बाजूची वाहतूक थांबल्याचा अंदाज आल्यानंतर वाघ ऐटीत बाहेर पडला. वाघाला सुरक्षित जाण्यासाठी बराच वेळ देण्यात आला होता. तेथे उपस्थित लोकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आहे.
रस्ता ओलांडण्यासाठी थांबलेल्या वाघासाठी महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. वाघाला रस्ता ओलांडून दिल्यानंतर वाहतूक पुन्हा चालू करण्यात आली. नागभीड-ब्रह्मपुरी महामार्गावरील सायगाता येथील ही घटना आहे. pic.twitter.com/H2fuTEtvRQ
— News18Lokmat (@News18lokmat) July 22, 2022
वाघ पाहण्याची इच्छा असणारे लोक प्राणीसंग्रहालयात किंवा अभयारण्यामध्ये मोठा खर्च करून जातात. इथे मात्र काही नशीबवान लोकांना रस्त्यावरून जाताना वाघ पाहायला मिळाला.