मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Make in India ला चीनी कंपन्यांचा धोका? देशात वाढतीये आयात

Make in India ला चीनी कंपन्यांचा धोका? देशात वाढतीये आयात

Make in India ला चीनचा धोका? देशात वाढतीये आयात

Make in India ला चीनचा धोका? देशात वाढतीये आयात

अ‍ॅपलला त्यांच्या विविध उत्पादनांसाठी घटक पुरवणाऱ्या चिनी कंपन्यांना भारत सरकारने प्राथमिक परवानगी दिली आहे. सुमारे 14 चीनी कंपन्यांना काही अटींसह भारतात त्यांचे कारखाने सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 19 जानेवारी: जगातील आघाडीची टेक कंपनी अॅपलला भारतात आणण्यासाठी सरकारला खूप संघर्ष करावा लागला. आता अ‍ॅपलनं भारतात आयफोन बनवण्यास सुरुवात केली असतानाच तिच्या पुरवठादार कंपन्यांनीही आपली तयारी केली आहे. दरम्यान चीनमधून भारतात  होणारी आयात विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे भारताच्या 'मेक इन इंडिया' प्रकल्पाला खर्‍या अर्थाने कडवी स्पर्धा मिळू शकते.

अ‍ॅपलला त्यांच्या विविध उत्पादनांसाठी घटक पुरवणाऱ्या चिनी कंपन्यांना भारत सरकारने प्राथमिक परवानगी दिली आहे. सुमारे 14 चीनी कंपन्यांना काही अटींसह भारतात त्यांचे कारखाने सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे.

चीनच्या पुरवठादार कंपन्या भारतात येणार-

17 चिनी कंपन्या अॅपलला वेगवेगळ्या वस्तूंचा पुरवठा करतात. यापैकी सुमारे 14 कंपन्यांनी सरकारकडे भारतात काम करण्याची परवानगी मागितली होती, ज्यावर प्राथमिक मान्यता देण्यात आली आहे. या 14 कंपन्यांमध्ये Luxshare, Sunny Optical, Uto Packaging Technology, Strong, Salcomp, Boson, Hans Laser Technology यांचा समावेश आहे.

या सर्व कंपन्या इतर कोणत्याही भारतीय कंपनीसोबत ज्वाईंट वेंचर स्थापन करूनच देशात काम करू शकतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे. ज्वाईंट वेंचरनंतर, उत्पादन सुरू करण्यापूर्वी कंपन्यांना परवाना दिला जाईल. ईटीने याबाबत अ‍ॅपलला मेल पाठवला असून अद्याप त्याला उत्तर मिळाले नाही.

यापैकी लक्सशेअर प्रिसिजन अ‍ॅपलला अ‍ॅपल वॉचेस, एअरपॉड्स आणि आयफोन पुरवते. सनी ऑप्टिकल कंपनीला आयफोनसाठी कॅमेरा लेन्स प्रदान करते.

हेही वाचा: Amazon च्या कर्मचाऱ्यांवरील संकट कायम! 2300 जणांना वॉर्निंग नोटीस

भारतात आयफोन बनवणाऱ्या 3 कंपन्या-

सध्या 3 तैवानच्या कंपन्या भारतात Apple iPhone चे उत्पादन करत आहेत. यामध्ये फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन यांचा समावेश आहे. या तीन कंपन्यांना भारत सरकारच्या PLI योजनेअंतर्गत स्मार्टफोन बनवण्याची परवानगी मिळाली आहे.

सध्या भारतात बनवलेल्या आयफोन्सपैकी 18 टक्के आयफोन भारतातून तयार केले जातात. या संदर्भात, तज्ञांचे मत आहे की या 14 कंपन्यांना मान्यता दिल्याने, देशात उत्पादित अॅपल आयफोन्सपैकी 50 टक्क्यांपर्यंत स्थानिक पातळीवर स्रोत मिळतील.

चीनमधून भारतात आयात वाढली-

नुकताच चीनच्या सीमाशुल्क विभागानं देशाच्या आयात-निर्यातीचा अहवाल जारी केला होता. यामध्ये 2022 मध्ये भारत आणि चीनमधील व्यापार 135.98 अब्ज डॉलर्सचा असल्याचे सांगण्यात आले. हा व्यापार 2021 च्या 125 अब्ज डॉलरपेक्षा 8.4 टक्के जास्त आहे.

चीनने भारताला 118.5 अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्तूंची निर्यात केल्याचं आकडेवारीवरून दिसून येते. हे 2021 च्या तुलनेत 21.7 टक्के अधिक आहे. दुसरीकडे, चीनने भारतातून केवळ 17.48 अब्ज डॉलरच्या वस्तूंची आयात केली. हे 2021 च्या तुलनेत 37.9 टक्के कमी आहे.

First published:

Tags: Apple