नवी दिल्ली, 6 सप्टेंबर : बदलती जीवनशैली, बैठ्या स्वरूपाचं काम, व्यायामाचा अभाव आणि चुकीच्या आहारामुळे लठ्ठपणाची (Obesity) समस्या वाढल्याचं दिसून येतं. लठ्ठपणामुळे हृदयविकार (Heart Disease) आणि डायबेटीससारखे (Diabetes) विकार होण्याचं प्रमाणदेखील वाढलं आहे. या गंभीर आजारांचे संभाव्य धोके लक्षात घेऊन बहुतांश जण व्यायाम आणि योग्य आहारावर भर देतात. वजन नियंत्रणासाठी आहारात (Diet) काही बदल आवश्यक असतात. काही जण कमी कॅलरीज खाण्याचा आणि जास्त प्रमाणात व्यायाम करण्याचा सल्ला देतात, तर काही जण रोजच्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थ जास्त समाविष्ट करण्याचा सल्ला देतात. या गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी वजन कमी होण्याच्या दृष्टीने रोजच्या आहारात मुबलक तंतुमय पदार्थ (Fiber) अर्थात फायबर्स असलेल्या भाज्यांचा समावेश असणं गरजेचं आहे. शरीर निरोगी राहण्यासाठी फायबर्स हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. तंतुमय पदार्थ हा भाजीपाल्यातला एक घटक आहे. या घटकामुळे मानवी शरीरातलं पाचक एंझाइम सहजपणे विघटित होऊ शकत नाही. त्यामुळे आहारात फायबरयुक्त भाज्यांचा समावेश गरजेचा आहे. यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. `एनडीटीव्ही फूड`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. वजन नियंत्रणासाठी व्यायामासोबतच आहारात काही बदल गरजेचे असतात. आहारात फायबरयुक्त भाज्यांचा समावेश केल्यास वजन नियंत्रणात येण्यास मदत होते. फायबर शरीरात विघटित होतात आणि शोषले जातात, तेव्हा ते शरीराला अनावश्यक पदार्थांचे शोषण करण्यापासून रोखतात. त्यामुळे आहारात फायबरयुक्त भाज्यांचा समावेश फायद्याचा ठरतो. Dry Fruits बाबत तुम्हाला ‘या’ गोष्टी माहितीय? हे फॅक्ट्स प्रत्येकाला माहित असायलाच हवेत वजन कमी व्हावं, यासाठी आहारात वांग्याचा (Eggplant) समावेश असावा. वांगी विद्राव्य आणि अद्राव्य फायबर्सचा चांगला स्रोत आहे. वांग्याच्या सालांमध्ये प्रामुख्याने अद्राव्य फायबर्स मुबलक असतात. तसंच वांग्याच्या गरामध्ये विद्राव्य फायबर असतात. वजन नियंत्रणासाठी आहारात चविष्ट वांग्याच्या भरताचा समावेश करू शकता. लाल भोपळ्यात (Pumpkin) कॅल्शियम, व्हिटॅमिन ए आणि के मुबलक प्रमाणात असतं. लाल भोपळ्यापासून गोड आणि तिखट चवदार पदार्थ बनवता येतात. वजन कमी करण्यासाठी लाल भोपळ्याची भाजी खाऊ शकता किंवा त्याचं सूप करून ते पिऊ शकता. भारतात फ्लॉवरची (Cauliflower) भाजी खूप लोकप्रिय आहे. फ्लॉवरपासून केवळ भाजीच नव्हे तर वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. ही भाजी खूप पौष्टिक असते. या भाजीत काही फायबर्स इनसोल्युबल असले, तरी जास्त उकळून ते पचायला हलके करता येतात. ग्रीन पीज अर्थात मटार (Green Peas) चवदार, पौष्टिक असतात आणि फायबर, लोह, व्हिटॅमिन ए व सी यांचा उत्तम स्रोत मानले जातात. मटार शिजवण्यास सोपे असतात. मटारचा वापर करून वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनवू शकता. Pomegranate Peels: डाळिंबाची सालही आहे बहुगुणी; इतक्या आरोग्य समस्यांवर उपयोगी भेंडीची भाजी खूप पौष्टिक असते. भेंडीत (Okra) कॅल्शियम, पोटॅशियम, कार्बोहायड्रेटस, प्रोटीन, व्हिटॅमिन, एंझाइम आणि वेगवेगळी मिनरल्स असतात. आतडी स्वच्छ राहण्यासाठी भेंडीचं सेवन फायद्याचं ठरतं. तसंच भेंडीत फायबर मुबलक असतात. ब्रोकोलीत (Broccoli) डाएटरी फायबर्स आणि व्हिटॅमिन सी हे घटक मुबलक प्रमाणात असतात. अभ्यासानुसार, प्रति कप ब्रोकोलीत पाच ग्रॅम फायबर्स असतात. थोडं तेल आणि लसूण घालून परतून ही भाजी चवदार करता येते. पालक (Spinach) खाल्ल्याने डोळ्यांचं आरोग्य सुधारतं, ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो आणि रक्तदाब कमी होण्यास मदत होते. यातल्या इनसोल्युबल फायबर्समुळे आरोग्य चांगलं राहतं. पालकाची भाजी, करी किंवा सूप बनवू शकता. वजन कमी करण्यासाठी आहारात या भाज्यांचा समावेश केल्यास उत्तम परिणाम दिसून येतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.