महाराष्ट्राचा खरा हीरो! घरात सतत होती मद्यपींची गर्दी, मात्र गरीबीवर मात करीत मुलाने रचला नवा इतिहास

महाराष्ट्राचा खरा हीरो! घरात सतत होती मद्यपींची गर्दी, मात्र गरीबीवर मात करीत मुलाने रचला नवा इतिहास

IAS होणं हे काही खायचं काम नाही असं म्हणतात. मात्र मेहनत, इच्छाशक्ती आणि व्यासंग असेल तर प्रतिकूल परिस्थितीतही यश तुमचंच आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 3 मे : ज्या घरात सतत दारुड्यांचा अड्डा होता, तेथे कोण कसं अभ्यास करू शकतं? मात्र एक मुलगा असाही आहे ज्याने या  परिस्थितीत केवळ अभ्यासचं केला नाही तर IAS होऊन दाखवलं. त्याचं नाव आहे डॉ. राजेंद्र भारुड... जन्माच्या काही महिन्यांपूर्वी त्यांच्या वडिलांचं निधन झालं. पोटापाण्यासाठी त्यांच्या आईसमोर मोठं संकट आ वासून उभं होतं. तीन मुलांना मोठं करण्याची जबाबदारी त्यांच्या खाद्यांवर आली होती. अशावेळेस त्यांच्या आईने दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केला.

मद्यपी स्नॅक्स आदी खाण्याचे पदार्थ आणण्यासाठी त्यांना पैसे देत होते त्यातून डॉ. राजेंद्र पुस्तकं विकत घेत होते. अशा परिस्थितही त्यांनी असा अभ्यास केला की कलेक्टर होऊन दाखवलं. डॉ. राजेंद्र भारुड महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात राहणारे आहेत. त्यांचा जन्म होण्यापूर्वीच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. आईवर तीन मुलांची जबाबदारी होती. मात्र गरीबी असली म्हणून रडत न बसता त्यांनी परिस्थितीवर मात करीत कलेक्टर होऊन दाखवलं.

आदिवासी समाजातील राजेंद्र भारुड यांची ही कहाणी आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या प्रवासाबद्दल ते म्हणाले, ‘मी आईच्या गर्भात होतो तेव्हा वडिलांचं निधन झालं. लोकांनी आईला अबॉर्शन करण्याचा सल्ला दिला. मात्र आईने नकार दिला. भयंकर गरीबी असतानाही माझा जन्म झाला. आई जेव्हा देशी दारू विकत होती तेव्हा मी 2-3 वर्षांचा होतो. मी रडल्यामुळे मद्यपींना त्रास व्हायचा. त्यावेळी ते दोन-चार थेंब माझ्या तोंडात टाकत असे आणि मी शांत व्हायचो’.

ते पुढे म्हणाले की, लहानपणी अनेकदा दुधाऐवजी दारू प्यायला दिली जायची. सातत्याने असं होत असल्याने त्यांना त्याची सवय लागली होती. अनेकदा सर्दी-खोकला झाला की औषधांऐवजी दारू प्यायला दिली जात. थोडा मोठ्या झाल्यावर मद्यपी मला काही खाण्याचे पदार्थ आणायला पैसे देत. त्यातूनच मी पुस्तकं खरेदी केली आणि अभ्यास केला.

मला अभ्यासत रुची होती. दहावीत मी 95 टक्के मार्क मिळवले. त्यानंतर 12 वीत 90 टक्के मार्कांनी उत्तीर्ण झालो. त्यानंतर 2006 मध्ये वैद्यकीय प्रवेश परीक्षा पास झाल्यानंतर मुंबईतील सेठ जीएस मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. येथे 2011 मध्ये कॉलेजच्या बेस्ट स्टुडेंटचा पुरस्कार मिळाला. अभ्यासदरम्यान मी नेहमी एका गोष्टीचा फार विचार करीत होतो. तेव्हा लोक म्हणायचे दारू विकणाऱ्याचा मुलगा दारुच विकणार. याचा मला खूप त्रास व्हायचा. मात्र मला हे मान्य नव्हते. यावेळी मी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. आईचा विश्वास आणि माझ्या मेहनतीमुळे मी ही परीक्षा पास झालो. राजेंद्र सांगतात, जेव्हा ते पहिल्यांदा कलेक्टर होऊन आपल्या आईसमोर गेले तेव्हा त्यांच्या आईला विश्वासच होत नव्हता. मात्र लोकांनी सांगितल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेना आणि त्यांच्या डोळ्यातून घळाघळा आनंदाअश्रू वाहू लागले.

संबंधित-लॉकडाऊनमध्ये नोकरी जाण्याचा धोका! घरबसल्या या व्यवसायातून करू शकता लाखोंची कमाई

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2020 06:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading